Breaking
ब्रेकिंग

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे यांच्यात सामंजस्य करार संपन्न

0 8 6 5 0 8

*महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे यांच्यात सामंजस्य करार संपन्न*

*कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि ड्रोन-तंत्रज्ञानाच्या वापराला मिळणार नवी दिशा*

*कुलगुरू डॉ. विलास खर्चे*

राहुरी तालुका जावेद शेख

एक छोटीशी तांत्रिक संकल्पना कृषी क्षेत्रात मोठा बदल घडवून आणू शकते. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि मशीन लर्निंग चा वापर करण्याची हीच योग्य वेळ आहे. या सामंजस्य करारामुळे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञान याद्वारे शेतीचे यांत्रिकीकरण करून गुणवत्तापूर्ण अन्न उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी नवीन संधी निर्माण होतील. या तंत्रज्ञानाच्या वापराने कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे यांच्यात संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यातील सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या उपस्थितीमध्ये या सामंजस्य करारावर संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी पिंपरी चिंचवड विद्यापीठाची संचालक संशोधन व विकास डॉ. भारत काळे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल माहेश्वरी, संशोधन व विकास समन्वयक डॉ. राहुल सोनकांबळे,कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर व कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ.सुनील कदम उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू डॉ. विलास खर्चे पुढे म्हणाले की पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर, सूक्ष्म व अचूक शेती तसेच हवामान बदलामुळे वाढणाऱ्या कृषी जोखमींचे व्यवस्थापन यासाठी एआय आधारित संशोधनाची आवश्यकता असल्याचे डॉ. खर्चे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी दोन्ही संस्थांकडे मोठ्या संधी असल्याचे सांगितले. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग, रोबोटिक्स, बौद्धिक संपदा हक्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि डेटा सायन्सचा कृषी क्षेत्रातील वापर यासारख्या विविध विषयांवर संयुक्तपणे काम करता येईल असे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. प्रशांत बोडके यांनी विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची माहिती दिली. डॉ.भारत काळे यांनी विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक कार्यक्रमांची तसेच सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांसोबत सुरू असलेल्या सहकार्याची माहिती दिली. डॉ. सुभाष भालेकर यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या ऐतिहासिक वाटचाल आणि विकास याविषयी सादरीकरण केले. डॉ. सुनील कदम आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या डॉ. स्वाती शिर्के- देशमुख या दोन्ही संस्थांच्या समन्वयकांनी सामंजस्य करारासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनील कदम यांनी केले. यावेळी कृषी महाविद्यालय, पुणे येथील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे