Breaking
ब्रेकिंग

दै .पुढारीचा११वा वर्धापन दिन सोहळा साजरा* *दैनिक पुढारी वर्धापन दिन निमित्ताने समाजिक क्षेत्रातील भरगोस कार्या बदल शैलेश चव्हाण पुरस्कार देऊन सन्मानित

0 3 9 0 4 2

दै .पुढारीचा११वा वर्धापन दिन सोहळा साजरा दैनिक पुढारी वर्धापन दिन निमित्ताने समाजिक क्षेत्रातील भरगोस कार्या बदल शैलेश चव्हाण पुरस्कार देऊन सन्मानित

अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे 

रायगड करांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलेला, वाचकांशी आपुलकी आणि जिव्हाळ्याचे अतुट नाते जपलेला दैनिक ‘पुढारी’ च्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त होरायझोन हॉल अलिबाग येथे वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन केले होते.

निःपक्ष व निर्भीड विचारांचा देदीप्यमान कृतिशील वारसा जपत, वाचकांच्या भक्कम साथीने दै. ‘पुढारी’ने आपली वाटचाल पूर्ण केली आहे. रायगड म्हणजे ‘पुढारी’ आणि ‘पुढारी’ म्हणजे रायगड असे समीकरण असलेल्या, रायगडकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या ‘पुढारी’च्या वर्धापन दिनाचा सोहळा म्हणजे आनंदाचा आणि कौटुंबिक सोहळाच आहे.

सदर सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मा नामदार भरतशेठ गोगवले फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच दमदार आमदार श्री महेंद्रशेठ दळवी हे उपस्थित होते यावेळी सो मुग्धा वैश्पायन यांचा स्वरसंध्या हा गायनाचा कार्यक्रम पार पडला…..या प्रसंगी दैनिक पुढारीने समाजिक क्षेत्रातील भरगोस कार्या बदल शैलेश चव्हाण यांना पुरस्कार देऊन सन्मान केला त्याबद्दल मी दैनिक पुढारीचा शतश: ऋणी आहे असे या प्रसंगी शैलेश चव्हाण यांनी सांगितले .यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे