Breaking
ब्रेकिंग

नवदृष्टी मिळालेले मतदार बजावणार मतदानाचे हक्क फिनिक्स सोशल फाउंडेशनची मतदार जागृती

राहुरी पोटनिवडणुकीत 100 टक्के मतदान करणाऱ्या गावांना 51 हजाराचे बक्षीस

0 7 9 8 0 6

नवदृष्टी मिळालेले मतदार बजावणार मतदानाचे हक्क
फिनिक्स सोशल फाउंडेशनची मतदार जागृती

राहुरी पोटनिवडणुकीत 100 टक्के मतदान करणाऱ्या गावांना 51 हजाराचे बक्षीस

अहिल्यानगर (प्रतिनिधी)-

फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या माध्यमातून नवदृष्टी मिळालेल्या ज्येष्ठ नागरिक व महिलांना मतदानाचे कर्तव्य बजावण्याचे आवाहन करण्यात आले. राहुरी पोटनिवडणुक आणि पुढील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील मतदानाचा हक्क बजावून सक्षम उमेदवार निवडून देण्याचे स्पष्ट करण्यात आले. राहुरी पोटनिवडणुकीत ज्या गावात शंभर टक्के मतदान होर्इल त्या ग्रामपंचायतला संस्थेच्या वतीने 51 हजार रुपयाचे बक्षीस देऊन सन्मान केला जाणार असल्याची माहिती फिनिक्सचे संस्थापक जालिंदर बोरुडे यांनी दिली.
फिनिक्स सोशल फाउंडेशनने मोफत नेत्र तपासणी शिबिराबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत एक आगळा-वेगळा मतदार जागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे. नागरदेवळे (ता. नगर) येथे नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराच्या माध्यमातून मोतीबिंदू व काचबिंदूग्रस्त रुग्णांची तपासणी करून, त्यांची मोफत शस्त्रक्रिया पुणे येथील के. के. आय. बुधराणी रुग्णालयात यशस्वीरीत्या करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दृष्टी परत मिळालेल्या रुग्णांचे शहरात आगमन होताच फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी नवदृष्टी मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत, या नव्या दृष्टीचा उपयोग केवळ स्वतःच्या जीवनातच नव्हे, तर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठीही करावा, असे आवाहन केले. “मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. नवदृष्टीतून चांगला, प्रामाणिक आणि विकासाभिमुख उमेदवार निवडण्यासाठी सर्वांनी मतदान करावे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक व महिलांनीही मिळालेल्या नवदृष्टीतून योग्य उमेदवाराची निवड करून मतदानाचा हक्क बजावण्याचा निर्धार व्यक्त केला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दृष्टीहीन व अल्पदृष्टीग्रस्त रुग्णांना दृष्टी मिळावी, यासाठी फिनिक्स सोशल फाउंडेशनने जिल्हाभरात एक व्यापक सामाजिक चळवळ उभी केली आहे. या उपक्रमांतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी नियमितपणे मोफत नेत्र तपासणी शिबिरे तसेच मोतीबिंदू व काचबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया आयोजित करण्यात येतात. आरोग्यसेवेबरोबरच मतदार जागृती करण्याच्या हेतूने फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती बोरुडे यांनी दिली .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे