अमळनेर शहरातील दगडी दरवाजा येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न*

*अमळनेर शहरातील दगडी दरवाजा येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर:-अमळनेर शहरात पुन्हा एकदा दगडी दरवाजा येथे वाहतूक कोंडीच्या प्रश्न निर्माण झाला आहे. बोरी नदीच्या पुलावरून वाहने प्रवेश करतात. त्यामुळे फरशी पुलावर कोंडी होत असल्याने सर्व सामान्य नागरिकास मोठ्या त्रास सहन करावा लागत आहे. पायी चालणाऱ्यांना तर चालणे अडचणी आहे.या भागात लहान मुले रस्ता ओलांडतान त्यांचा सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण होईल किंवा नाकारता येणारच आहे.शहरात अवजड डंपराची वाहतुक पैलाड मार्गे येत असतात.त्यामुळे लहान वाहनधारकांना गाडी चालवणे मुश्किल होऊन जाते.
दगडी दरवाजा मार्गाने चोपडा, जळगाव, पारोळा कडून येणारी येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. सुट्ट्यांचा काळ असल्याने हा प्रश्न खुप महत्त्वाचा आहे.तरी नगरपालिकेने याबाबत योग्य ती कारवाई करावी.

येथे अपघात होत असल्याच्या घटना आहेत.काही दिवसापूर्वी बोरी नदी पुलावर संध्याकाळी तरुण मुलांचा डंपर खाली येऊन मृत्यु झाला.असे अनेक लहान मोठे अपघात घडत असतात पण खरी परिस्थिती जर लक्षात शहरातील समशानभूमी कडून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या भागात सुद्धा वाहतूक कोंडीच्या प्रश्न निर्माण झाला.



