श्रीमती. रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयाचे शरीरसौष्ठव स्पर्धेत यश…
श्रीमती. रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयाचे शरीरसौष्ठव स्पर्धेत यश…
इंदापूर / विशेष प्रतिनिधी
इंदापूर : गुरुवार(दि.- ५) रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. यांच्या अंतर्गत अंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धा अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर या ठिकाणी संपन्न झाल्या. या अंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी च्या श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयातील कला शाखेतील पहिल्या (एफ वाय बी ए ) वर्गातील चि.बशारत बागवान या विद्यार्थ्याने शरीरसौष्ठव स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. व त्याची निवड विभागीय पातळीवर झाली या स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक प्रा. लोंढे सर, प्रा.जाधव सर, प्रा.घोगरे सर ,प्रा. चितारे सर यांनी केले.
सदर स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विभागीय पातळीवर निवड झाल्याबदल संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील , उपाध्यक्ष मनोज पाटील, संचालक उदयसिंह पाटील, सचिव किरण पाटील, सर्व संचालक मंडळ व प्राचार्य डॉ. लहू वावरे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.