ब्रेकिंग
जानवे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत पितांबर देवराम पाटील यांची चेअरमनपदी निवड
0
3
9
0
5
0
जानवे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत पितांबर देवराम पाटील यांची चेअरमनपदी निवड
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर तालुक्यातील जानवे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत पितांबर देवराम पाटील यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली. विद्यमान चेअरमन योगेश शिवाजी पाटील यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. चंद्रकांत ओंकार पाटील यांची व्हाईस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली.पितांबर पाटील यांनी जानवे, आटाळे, रणाईचे, डांगर, पिळोदे अशा अनेक गावात सेक्रेटरी म्हणून उत्कृष्ट कार्य केले होते. पितांबर पाटील यांना चेअरमन म्हणून योग्य तो न्याय मिळाला. त्यांचे सर्व सोसायटी सभासदांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस टी महाजन यांनी काम पाहिले.
0
3
9
0
5
0