Breaking
ब्रेकिंग

अपहरण करून अत्याचार झालेल्या अल्पवीयन मुलीची राहुरी पोलीसांकडून एरंडोल जिल्हा जळगाव येथून सुटका, आरोपीस अटक

0 3 9 0 2 6

प्रतिनिधी :  जावेद शेख

दिनांक 25/10/2024 रोजी सकाळी 9/30 वाजण्याचे सुमारास फिर्यादीची अल्पवयीन पुतणी वय 17वर्ष हिस आरोपी याने लग्नाचे अमिष दाखवून अपहरण करुन पालकाचे कायदेशीर रखवालीतुन पळवुन नेले बाबत फिर्यादी वरुन राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर I 1136/2024 BNS 137(2),87 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयामध्ये आरोपी व अपहरीत मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध्द नसतांना बातमीदाराच्या मदतीने अथक परीश्रम घेवुन गुन्हयातील अपहरीत मुलीचा माग काढुन तिचा शोध घेतला असता ती आज रोजी *जळगाव जिल्ह्यात एरंडोल येथे अपहरण केलेल्या आरोपी गोकुळ ज्ञानदेव शिंदे राहणार सोनगाव तालुका राहुरी सह मिळून आल्याने* आरोपीच्या ताब्यातून पिडीतेची सुटका करून राहुरी पोलीस स्टेशन येथे आणले आहे. अपहरीत मुलीच्या नातेवाईकांना त्याबाबत माहिती दिली असुन अपहरीत पिडीत मुलीने तिच्या जबाबात आरोपी मजकूर याने तिच्याशी बळजबरीने वारंवार शारीरिक संबंध केल्याचे नमूद केल्याने सदर गुण्हयात भारतीय न्याय संहिता कलम64(2)(m) सह लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम कलम 4,8,12 प्रमाणे कलम वाढ करण्यात आली आहे. गुन्हयाचा अधिक तपास सपोनि पवार हे करत आहेत.

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सन 2016 मध्ये अपहरन झालेली एक मुलगी, सन 2021 मध्ये अपहरण झालेल्या 2 मुली, सन 2022 मध्ये अपहरण झालेली एक मुलगी, सन 2023 मध्ये अपहरण झालेल्या 5 अल्पवयीन मुली तसेच सन 2024 मध्ये अपहरण झालेले एकूण 21 मुली, व 5 मुले असे एकूण 35 अपहरित बालकांचा(30 मुली व 5न मुले ) जानेवारी 2024 पासून शोध घेवून त्यांना त्यांचे पालकांचे ताब्यात देवून अपहरण करणाऱ्या एकूण 35 आरोपींना अटक करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर , श्री. डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे,सपोनि पवार पो.हे.कॉ. सतिष आवारे,पोहेकॉ राहुल यादव सुरज गायकवाड जायभाय , अशोक शिंदे,पो शि ढाकणे सचिन ताजने, सतीश कुऱ्हाडे, रवी पवार, आजिनाथ पाखरे, शकुर् सय्यद नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर व पो.ना.सचिन धनद, पो.ना.संतोष दरेकर, पो.ना.रामेश्वर वेताळ नेमणुक अपर पोलीस अधीक्षक सो श्रीरामपुर जि.अहमदनगर मोबाईल सेल यांनी केलेला आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे