Breaking
ब्रेकिंग

शेतकरी बांधवांच्या कष्टकरी आशीर्वादाने जग सुखी-सुभाष जाधव

वसंतनगर येथे कृषी दिवस, वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा कार्यक्रम :-

0 7 6 9 4 3

*शेतकरी बांधवांच्या कष्टकरी आशीर्वादाने जग सुखी-सुभाष जाधव*

*वसंतनगर येथे कृषी दिवस, वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा कार्यक्रम :—*

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

पारोळा :–
आज एकविसाव्या शतकात जगत असताना संगणक युग म्हणून जरी आमची ओळख असली तरी शेतकरी बांधवांच्या आशीर्वादानेच व त्यांच्या कष्टाने जग सुखी आहे. असे मत वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी वसंतनगर ता. पारोळा येथील प्राथमिक, माध्यमिक, जुनिअर कॉलेजमध्ये माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केले.
यावेळी आश्रम शाळेसह गावात कृषी दिवस व वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेत वसंतराव नाईक यांची प्रतिमा पूजन करून विद्यार्थ्याची रॅली काढण्यात आली. यावेळी गावातील चौका-चौकात ग्रामस्थ, महिलांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

*विध्यार्थ्यांच्या मिरवणुक, बॅनरने वेधले लक्ष :–* लेझिम खेळणाऱ्या विध्यार्थिनीनी गावातील चौका-चौकात लेझिम खेळीत घोषणानी परिसर दनाणला होता. वृक्ष दिंडी,हरितक्रांती, शेती, पर्यावरण, यावर जनजागृती करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी डिजिटल बॅनर बनवत जनजागृती केली. प्राथमिक आश्रम शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनी मन्नू जाधव, पियू जाधव यांनी बंजारा महिलांच्या वेशभूषेत लक्ष वेधून घेतले होते. या कार्यक्रमाच्या मिरवणुकीत ग्रामस्थ, महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यानंतर वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक श्रीमती एल. एस. पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोपान पाटील, जेष्ठ शिक्षक एस जे भामरे, बी. पी. पाटील, डी. एस पाटील, एम डी सूर्यवंशी, के आर पाटील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील तर आभार प्रदर्शन पी. एच. निकुंभे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे