Breaking
ब्रेकिंग

गुंडेगाव येथील जलजीवन योजना फेल ; भाजप पक्षाचा कार्यकर्ता मालामाल?

0 7 6 9 3 4

गुंडेगाव येथील जलजीवन योजना फेल ;  पक्षाचा कार्यकर्ता मालामाल?

वाळकी / विशेष प्रतिनिधी : दादासाहेब आगळे

महाराष्ट्रात ग्रामीण भागात प्रत्येक घराला तसेच वाडी-वस्तीवर नळाद्वारे सुरक्षित व पुरेसे पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवत केंद्र सरकारने ‘जलजीवन मिशन’ योजना आखली १५ ऑगस्ट २०१९ रोजी या योजनेला सुरुवात झाली. २०२४ पर्यंत देशातील सर्व ग्रामीण कुटुंबांना नळजोडणी देण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठरवले गेले. ही योजना विशेषतः महिला अन् लहान मुलांचे आरोग्य लक्षात घेऊन आखली गेली होती. मोठा गाजावाजा करून राज्य सरकार आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. त्यात जलस्रोत निर्माण करणे, जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणे, पाईपलाईन टाकणे व घराघरात नळजोडणी करण्यावर भर देण्यात येणार होता.तसेचपाणी गुणवत्ता तपासणी व देखभाल व्यवस्थापनाचेही नियोजन करण्यात येणार होते, मात्र हे सारे स्वप्नच राहिले. यातच गुंडेगावचा   सक्रिय कार्यकर्ता तसेच माजी आ . पाचपुते तसेच विक्रम पाचपुते समर्थक व्यक्तीने कोट्यावधी रुपये लाटले असुन योजना पूर्ण न करता एजन्सी कडून कोटी रुपये हडप केल्याचा दावा होत असल्याचे नागरिकांच्या चर्चेतून समजते .यातच गावात भागात अनेक ठिकाणी कुठलेही नियोजन न करता फक्त पाईप पुरले. पाईपलाईनचे अर्धवट कामे झाली आहेत. अनेक ठिकाणी पाईपलाईनचे खोदकाम रस्त्यावर करण्यात आले. त्यामुळे अनेक रस्ते खराब झाले. नागरिकांना नळकनेक्शन न देता हे फक्त पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. रस्त्यातून नळजोड देताना डोकेदुखी वाढणार आहे. योजनेचा हेतू चांगला होता. पाणीबचत आणि व्यवस्थापनावर विशेष भर दिला जाणार असल्याचे बोलले होते. मात्र, गावपातळीवर जलसमित्या स्थापन केल्या गेल्या नाहीत. नागरिकांना जल परीक्षण किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे कुठलेही प्रशिक्षण दिले नाही. जलजीवन मिशन प्रभावीपणे राबवली जावी, हे शासनाचे स्वप्न आतापर्यंत तरी स्वप्नच राहिले आहे. शासनाने ठरवल्याप्रमाणे पाण्याचे स्रोत उपलब्ध नाहीत. जलजीवन मिशनच्या कामात नियोजनबद्धता नाही. संबंधित अधिकारी, नेमलेले इंजिनियर कुठेही हजर नव्हते. जेसीबी चालक त्यांच्या सोयीनुसार पाहिजे त्या ठिकाणी खोदकाम करून पाईपलाईन करीत होता. पुढील पाच वर्षात तरी या योजनेचे काम पूर्ण होईल की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

सविस्तर माहिती लवकरच

क्रमशः

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे