मुळा नदी काठच्या गावातील नागरिकांनी संतर्क रहाण्याचा इशारा.
मुळाचा विर्सग आता 25 हजार कुसेक्स ने ; मुळा माई दुथडी भरून वाहतेय
मुळा नदी काठच्या गावातील नागरिकांनी संतर्क रहाण्याचा इशारा.
मुळाचा विर्सग आता 25 हजार कुसेक्स ने ; मुळा माई दुथडी भरून वाहतेय
राहुरी तालुका / विशेष प्रतिनिधी : जावेद शेख
नगर जिल्ह्यातील धरणाच्या धरण क्षेत्रात सातत्याने अतिवृष्टी सदृश्य पाऊस होत असल्याने मुळा धरणाचा पूर नियंत्रण कक्ष अलर्ट मोडवर आल्याचे दिसत आहे . राहुरीच्या मुळा धरण पाणीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून मुळा नदी पात्रात 25 हजार क्यूसेक ने पाणी विर्सग सोडला जातोय शनिवारी 20 हजार क्यूसेक पाणी विर्सग वाढवण्यात आला होता आता रविवारी सकाळी आणखी 5 हजार क्यूसेक पाणी वाढविले पाणी जास्त आले तर आणखी पाणी विर्सग वाढू शकतो असे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दूरध्वनीवरून बोलताना सागितले तर कर्मचारी संध्या धरण क्षेत्रात कार्यरत असून धरण पाणी साठ्यावर लक्ष ठेवून आहेत
मुळा धरणसाठा ऑगस्ट अखेर 99 टक्के पर्यंत पोहोचला असून धरणाच्या परिचलन सूची निर्देशाप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात धरण भरल्याचे जाहीर केले जाते . गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्र व लाभक्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे . मुळाधरणाच्या नजीकच्या भागात राहुरी , पारनेर कडील भागात जोरदार पाऊस होत असल्याने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे . त्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक जलसंपदा विभागाच्या पूरनियंत्रण कक्षा कडून तासा तासाला घेतली जात आहे .
दरम्यान राहुरी तालुक्यात पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असून तहसीलदार नामदेव पाटील यांनी तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी जोर धरु लागली आहे .
तर दुसरीकडे नगर मनमाड राज्य मार्गावरील पावसात नाल्या बनवण्याचे काम कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे . जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी राज्य मार्गावरील जड वाहतुक वळवली असल्याने तुर्त तरी आपघात कमी प्रमाणात आहे .



