Breaking
ब्रेकिंग

शेळीपालन शास्त्रोक्त पद्धतीने करून जास्तीत जास्त नफा मिळवावा – विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे

0 8 6 5 0 9

*शेळीपालन शास्त्रोक्त पद्धतीने करून जास्तीत जास्त नफा मिळवावा – विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे*

राहुरी तालुका जावेद शेख

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शाश्वत व व्यावसायिक शेळीपालनाबाबत नवीन तंत्रज्ञान तयार केले आहे. त्याचा फायदा घेऊन शेळी पालकांनी आपला शेळीपालन व्यवसाय शास्त्रोक्त पद्धतीने करून जास्तीत जास्त नफा मिळवावा असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत असलेल्या शेळी सुधार प्रकल्पांतर्गत शेळी पालकांसाठी शाश्वत शेळीपालन तंत्र या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. दिनकर कांबळे बोलत होते. यावेळी प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रशिक्षण समन्वयक डॉ. विष्णू नरवडे, डॉ. दिलीप देवकर, डॉ. सुनील अडांगळे व डॉ. अमर लोखंडे उपस्थित होते. शेळी पालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, व्यवसायिक शेळी पालनाबाबत तसेच नवनवीन तंत्रज्ञानाबाबत सजगता निर्माण व्हावी या हेतूने महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे व संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके व विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणे आयोजित करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून सदरच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने पैदास, आहार व आरोग्य व्यवस्थापन, पशुधनासाठी चारा व्यवस्थापन तसेच शेळीच्या दुधाचे गुणधर्म व मूल्यवर्धन या विषयांवर डॉ. विष्णू नरवडे, डॉ. दिलीप देवकर, डॉ. सुनील अडांगळे, डॉ. प्रमोद साखरे, प्रा. विपुल वसावे, श्री. सुमित शिंगाडे, श्री. सचिन तोडकर, श्री. सचिन वाईचळ, श्री. स्वप्नील बागुल, डॉ. महिंद्र मोटे, डॉ. रवींद्रनाथ निमसे डॉ. अमर लोखंडे, कु. सपना जाधव व कु. रेवती शितोळे यांनी मार्गदर्शन केले. आजपर्यंत या शेळी संशोधन प्रकल्पाने 28 प्रशिक्षणाद्वारे 1078 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले आहे.
यावेळी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विष्णू नरवडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अमर लोखंडे यांनी केले. या प्रशिक्षणासाठी 70 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. संदीप पवार, श्री. रमेश कलापुरे, श्री. ज्ञानेश्वर डांगे, श्री. गौरव घोलप या प्रकल्पाच्या कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे