करमाळा तालुक्याच्या शांतता व सलोख्यास कोणी बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही..पोलीस निरीक्षक विनोद घुगे

करमाळा तालुक्याच्या शांतता व सलोख्यास कोणी बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही..पोलीस निरीक्षक विनोद घुगे
करमाळा / प्रतिनिधी : सचिन जव्हेरी
हिन्दु नववर्ष गुढीपाडवा,रमजान ईद,रामनवमी असे सण उत्सवाचे दिवस असल्याने करमाळा शहर व तालुक्यातील हिन्दु-मुस्लिम बांधवांनी सालाबादप्रमाणे शांततेत व सलोख्याने पार पाडुन, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याकडे लक्ष ठेवावे,यास कोणी बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय करणार नाही असे रोखठोक प्रतिपादन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले करमाळा तालुका व शहर हे शांतताप्रिय असल्याचा इतिहास असुन,सर्व जाती-धर्मातील नागरिक एकमेकांशी आपुलकीने व प्रेमाने राहतात. एकमेकांच्या सण-उत्सव -जयंती यामध्ये तितक्याच भक्तिभावाने सहभागी होऊन मोठ्या आनंदात साजरे केले जातात. असेच हे वातावरण अबाधित ठेवावे. मी पहात आहे, करमाळ्यातील नागरिक,व्यापारी,विविध पक्ष-संघटना यांचे पदाधिकारी हे कधीही द्वेष भावनेतून एकमेकांकडे पाहत नाहीत व तसे वागतही नाहीत,हे निश्चितच करमाळ्याच्या सलोख्यास गर्वाची अभिनंदनीय व कौतुकास्पद बाब आहे. असे हे करमाळा असल्याने कोणीही कसलीच शंका मनात न आणता आपला एकोपा असल्याने सण उत्सव शांततेत पार पाडावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले आहे.