Breaking
ब्रेकिंग

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात नामदेवराव जगताप यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करा : माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ 

0 8 9 6 7 5

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात नामदेवराव जगताप यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करा : माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ 

करमाळा (विशेष प्रतिनिधी सचिन जव्हेरी)

विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त माजी आमदार नामदेवराव जगताप यांचा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात पूर्णाकृती पुतळा उभा करावा अशी मागणी करमाळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ यांनी केली आहे .याबाबत अधिक बोलताना ओहोळ यांनी सांगितले की,सोलापूर जिल्ह्याचे लोकनेते देशभक्त माजी आमदार नामदेवराव जगताप यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही,स्वतः अल्पशिक्षित असल्याची खंत होती . त्यामुळे त्यांनी करमाळा शहरात महात्मा गांधी विद्यालयाच्या विस्तार करण्यात मोलाचे योगदान दिले .त्याबरोबरच करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी विद्या विकास मंडळाची स्थापना करून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची उभारणी केली . सुरुवातीच्या काळात त्यांनी मार्केट यार्ड मध्ये कॉलेज चालवले त्यानंतर भूसंपादन, खरेदी आदी प्रक्रिया पूर्ण करून महाविद्यालयाची देखणी व प्रशस्त, सुंदर अशी इमारत उभी केली .त्याकाळी मेडिकल कॉलेजला देखील लाजवेल अशी भव्य व दिव्य इमारत जगताप यांनी उभी केली . त्यामुळे करमाळा तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना करमाळ्यातच उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली . हायस्कूल व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दळणवळणाचा त्रास होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी वसतीगृहाची स्थापना केली . एस टी महामंडळाचे सदस्य असल्यामुळे माजी आमदार जगताप यांनी गावोगावी एसटीच्या माध्यमातून दळणवळणाची देखील सोय केली . १९६६ ते २०२६ म्हणजे आजपर्यंत या शहरात जगताप यांनी स्थापन केलेले हे एकमेव महाविद्यालय आहे . या महाविद्यालया मधे शेकडो जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली . तसेच उच्च शिक्षण घेतल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना पुणे – मुंबई चे खेटे न घालता करमाळ्यातच शिक्षण घेता आल्यामुळे उच्च पदांवर काम करण्याची संधी मिळाली . करमाळा तालुक्यातील येणाऱ्या भावी पिढीला करमाळा तालुक्यासाठी शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून नामदेवराव जगताप यांनी केलेल्या कार्याची माहिती व्हावी व त्यांच्या या सत्कार्याचे चिरंतन स्मरण राहावे यासाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या इमारती समोरील प्रांगणात नामदेवराव जगताप यांचा भव्य व दिव्य पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभा करावे अशी यामागील भावना असल्याचे करमाळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ यांनी सांगितले .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे