Breaking
ब्रेकिंग

रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करणाऱ्या कटरची मागणी…

0 3 9 0 5 0

रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करणाऱ्या कटरची मागणी…

अलिबाग :  राजेश बाष्टे 

अलिबाग : रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचारीची (कटर) मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चौल विभाग प्रमुख मारुती भगत यांनी केली आहे.

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मागील पाच वर्षापासून शवविच्छेदन करणे करिता (कटर) लागणाऱ्या व्यक्तीची जागा रिक्त असून, सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुडकोली, कुदे, बामणगाव, खानाव आदी ६४ गावांचा समावेश आहे. सदर प्राथमिक केंद्रात अपघात झालेला व्यक्ती आल्यास अथवा मृत झाल्यास त्या व्यक्तींचा शवविच्छेदन करण्याची आवश्यकता असते परंतु सदर प्राथमिक केंद्रात शवविच्छेदन करणारा व्यक्ती (कटर) यांची जागा मागील पाच वर्षापासून रिक्त आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कटरची व्यवस्था नसल्यामुळे शवविच्छेदन करणेकरिता १५ किलोमीटर दूर अलिबाग येथे जावे लागते. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर त्वरित विचार करून कटर ची व्यवस्था करावी अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चौल विभाग प्रमुख मारुती भगत यांनी पत्राद्वारे केली आहे.
यावेळी रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग, रायगड जिल्हा अधीक्षक यांच्याकडे निवेदन दिले आहे. यावेळी चौल ग्रामपंचायत उपसरपंच अजित गुरव, उपविभाग प्रमुख शैलेश घरत, निलेश गाडे, अशोक नाईक, जनार्दन कोंडे, राजेंद्र नाईक व शिवसैनिक उपस्थित होते.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचारीची (कटर) याची भरती करून कर्मचाऱ्याला योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यावरीत सेवेसाठी रुजू करण्यात येईल असे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे