Breaking
ब्रेकिंग

राहुरी येथील बाजारपेठेतून कपड्याचे गाठोडे चोरणारा आरोपी जेरबंद

पोलीस कस्टडी दरम्यान गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व चाकू हस्तगत

0 3 9 0 2 8

राहुरी येथील बाजारपेठेतून कपड्याचे गाठोडे चोरणारा आरोपी जेरबंद

सदर गुन्ह्यातील दुसरा आरोपी फरार असून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करणे आहे

पोलीस कस्टडी दरम्यान गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व चाकू हस्तगत

राहुरी वृत्तसेवा /  जावेद शेख

कपड्याचे व्यापारी सुधीर नागपाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशन गु र नं-1300/2024 बीएनएस कलम 309(4)112(2) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध जबरी चोरी चा गुन्हा दाखल झाला होता.
दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीची सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती घेऊन संशयित आरोपी राजू रवी आरकेरी वय 28 रा. अंबरनाथ जिल्हा ठाणे याला त्याचे राहते घरून ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला दिनांक 19/12/2024 रोजी अटक केली असून, पोलीस कस्टडी दरम्यान त्यांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू व वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. त्याचा दुसरा साथीदार नामे संतोष विनायक गायकवाड रा.अंबरनाथ हा फरार असून राहुरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर, श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली , सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते,पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे, सुरज गायकवाड,राहुल यादव,पोलीस कॉन्स्टेबल-जयदीप बडे, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे,नदीम शेख सचिन ताजने, नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे