Breaking
ब्रेकिंग

गांधलीपुऱ्यात भरदिवसा २ हजार रुपये लुटले ;  रात्री पोलिसांनी आरोपींना केली अटक 

0 3 9 0 3 2

गांधलीपुऱ्यात भरदिवसा २ हजार रुपये लुटले ;  रात्री पोलिसांनी आरोपींना केली अटक 

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर : भरदिवसा दमबाजी करून धुळ्याच्या एकाकडून दोन हजार रुपये बळजबरीने काढून घेतल्याची घटना ४ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पाचकंदील चौकात शीतल बियर बार जवळ घडली.विनोद कैलास ठाकरे रा एकलव्य चौक नगाव बारी धुळे हा आपले मित्र ज्ञानेश्वर भुरा मोहिते , ईश्वर अभिमन मोरे यांना घेऊन घराचे बांधकाम ठरवण्यासाठी अमळनेर आले होते. पाचकंदील चौकात त्यांचे पेट्रोल संपले म्हणून ते शितल हॉटेल जवळ थांबले. त्यावेळी तेथे तीन जण आले मोटरसायकलची चावी काढून घेतली. त्यांनी ठाकरे यांच्या खिश्यात हात घालून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. ठाकरे पैसे ईश्वर मोरे यांच्याकडे देत असतांना एकाने पैसे हिसकावून घेतले. व चावी देवुन चुपचाप यहासे चले जाव , मै यहाका दादा हु, मेरेपर बहोत गुन्हे है म्हणत दादागिरी केली. विनोद ठाकरे याने अमळनेर पोलीस स्टेशनला दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पीएसआय नामदेव बोरकर मिलिंद सोनार , विनोद संदानशीव, अमोल पाटील , गणेश पाटील ,उज्वल म्हस्के ,प्रशांत पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनेतील आरोपी हे मोझम शेख शब्बीर शेख , जितू रमेश चव्हाण दोन्ही रा गांधलीपुरा असल्याचे निष्पन्न केले आणि त्यांना रात्री ९ वाजेच्या सुमारास अटक केली. चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे