Breaking
ब्रेकिंग

राहुरी पोलीस स्टेशन तर्फे राबविण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी अभियानाची आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे 1200 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व रॅलीने झाली सांगता

0 8 6 6 9 9

राहुरी पोलीस स्टेशन तर्फे राबविण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी अभियानाची आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे 1200 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व रॅलीने झाली सांगता*

राहुरी तालुका जावेद शेख

राहुरी पोलीस स्टेशन तर्फे दिनांक 13/8/2025 ते 17/82025 असे चार दिवस राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले सदर अभियानामध्ये राहुरी शहर व तालुक्यातील शाळा व विद्यालयातील सुमारे 9000 विद्यार्थ्यांना राहुरी पोलीस स्टेशन तर्फे अंमली पदार्थ विरोधी अभियाना बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अभियानाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आंतर शालेय विविध स्पर्धा घेऊन, 15 ऑगस्ट 2025 रोजी पारितोषिक देण्यात आले.
अभियानाच्या शेवटच्या दिवशी आज दिनांक 17/8/2025 रोजी *महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे डॉ.सी व्ही रामन बालवैज्ञानिक परीक्षा व कार्यशाळा या कार्यक्रमासाठी राज्यातून आलेले सुमारे 1200 विद्यार्थी व त्यांचे सुमारे 2400 पालकांना अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियाना अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मार्गदर्शन केले* व त्यानंतर सदर अभीयाना अंतर्गत रॅली काढूनजनजागृती केली. सदर रॅलीमध्ये विद्यार्थी व पालकांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुधीर फाकटकर , तंत्रज्ञ GMRT, खोडद पुणे व अंकिता नगरकर, पुणे तसेच अध्यक्ष म्हणून क्षीरसागर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. अरूण तुपविहिरे सर अमली पदार्थ विरुद्ध जनजागृती बरोबरच राज्यभरातील सी व्ही रामनवैज्ञानिक परीक्षेतील तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय बक्षिस पात्र विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले .
सदर अमली पदार्थ विरोधी जनजागृतीची मोहीम ही मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घाडगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री देवदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली . यावेळी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.अरूण तुपविहिरे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे