Breaking
ब्रेकिंग

अनिल हराळ यांना गुरुकुल चा आदर्श पुरस्कार प्रदान..

0 7 9 8 9 8

अनिल हराळ यांना गुरुकुल चा आदर्श पुरस्कार प्रदान..

वाळकी प्रतिनिधी :- नगर तालुक्यातील गुंडेगावाचे पोलिस कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल हराळ यांना श्री नवनाथ वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल निमगाव वाघा आयोजित दरवर्षी सामाजिक, धार्मिक,शैक्षणिक,नौकरी अशा विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला संस्थेच्या वतीने पुरस्कार दिला जातो.या वर्षी श्री अनिल राजाराम हराळ यांना संस्थेच्या वतीने आदर्श पोलीस कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.आदर्श पोलीस पुरस्कार महाराष्ट्र वारकरी भूषण ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम उर्फ छोटे माऊली यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी श्री संत नामदेव महाराज यांचे वंशज पंढरपूर ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास तसेच ह.भ.प.विठ्ठल फलके महाराज,सौ. कविता अनिल हराळ, सचिव जय जवान जय किसान सेवाभावी संस्था गुंडेगाव, ह.भ.प.ब्रह्मदेव महाराज कापसे मेजर, युवराज ढवळे साहेब, ह.भ.प.गोविंद महाराज, ह.भ.प.अजय चौरे महाराज, ह.भ.प.सुभाष महाराज औटी,सरपंच साहेबराव बोडखे निमगाव वाघा तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते
अनिल हराळ हे जय जवान जय किसान संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक कार्य करत असतात त्यांनी वारकरी भागवत सांप्रदायिक भावनेतून समाज सेवेचा आगळा वेगळा ठसा निर्माण केला आहे. या त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेत त्यांना आदर्श पोलिस पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांना यापूर्वीही त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदरचा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ,गुंडेगावचे मा. उपसरपंच संतोष भापकर,संजय कोतकर,सुनिल भापकर,सतिश चौधरी,शिवनाथ कोतकर तसेच ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे