दहिगाव येथे भव्य रामनवमी यात्रा

दहिगाव येथे भव्य रामनवमी यात्रा
नगर प्रतिनिधी: शिवा म्हस्के
अहिल्यानगर श्री राम जन्मोत्सवनिमित्त दहिगाव (ता.नगर ) येथे हिंदु नव वर्ष म्हणजे गुढीपाडवा या दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात होत असते श्री राम चंद्राच्या या पावन भुमित हा दिव्य सोहळा रंगला आहे. श्री राम नवमी यात्रे साठी ५:एकर क्षेत्रात पार्किंग यात्रा दुकान लावण्यासाठी व्यवस्था केली आहे. या ठिकाणी सकाळी ज्ञानेश्वरी पारायण वाचना साठी वृद्ध तरुण महिला भगिनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन ज्ञानेश्वर पारायण आज सांगता झाली. काकडा, रामरक्षा, गाथा भजन हरिपाठ, किर्तन, जागर विणेकरी पहारा संध्याकाळी ७ते ९ हरी किर्तन ९ नंतर महाप्रसाद आयोजन करण्यात येते. या सोहळ्यात दररोज हजारो भाविक भक्त सहभागी होतात २६ मार्च रोजी रामनवमी उत्सव असल्याने अहिल्यानगर जिल्हा या ठिकाणी भावीक भक्त येतात या ठिकाणी आता पर्यंत ह.भ.प रामायणाचार्य मनोहर महाराज सिनारे, रामायणाचार्य गणेश महाराज घोडके, भगिरथ महाराज काळे, कैलास महाराज येवले, गोविंद महाराज शिंदे, बबन महाराज बहिरवाल आतापर्यंत किर्तन सेवा झाली आहे. ह.भ.प पांडुरंग महाराज उगले, दि. २६ मार्च ला सकाळी कावड मिरवणूक होणार तसेच सकाळी १० ते १२ श्रीराम जन्मोत्सवाचे किर्तन ह. भ. प अद्वैत वेदांतभास्कर पुंडलिक महाराज जंगले शास्त्री महाराज यांचे होणार आहे. ह. भ. प श्रीनिवास महाराज घुगे या़चे संध्याकाळी ७ तेज्ञ ९ किर्तन होणार आहे. दि.२७ मार्च ला सकाळी ८.वाजात श्री राम महिला टाळ पथक सर्व भजनी मंडळ ग्रथराज ज्ञानेश्वर मिरवणूक होईल तंदनंतर काल्याचे किर्तन सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. आचार्य ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांचे होणार आहे.या ठिकाणी श्री राम मंदिर परिसरात भगवमय मंगलमय वातावरण आहे. मंदिर परिसरात तरुण दररोज स्वच्छ्ता करत असतात मंदिर परिसरात विद्युत रोषणाई परिसरात चमकदार झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग वरून प्रवासी लक्ष वेधून घेणारं देखावा या ठिकाणी आहे . अनेक भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर देणगी देत आहेत. या ठिकाणी नवस बोलणारे व नवस फेडणारे रिघ लागलेली असते पेडे गुळ शेरणी नारळ तोरणं बांधून आपला नवस बोलता आणि आपली इच्छा आकांक्षा पुर्ण झाल्यावर नवस पुर्ती या ठिकाणी देणगी स्वरूपात कोणी वस्तू स्वरूपात देऊ नवस फेडतात श्री राम ट्रस्ट अध्यक्ष शिवहरी म्हस्के, या भक्तीमय किर्तन सेवा लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे. ट्रस्टचे उपअध्यक्ष मोहन निमसे, कोषाध्यक्ष बाबासाहेब बनकर, सरचिटणीस कचरु नाना गायकवाड, चिटणीस अनंत द्रविड, वंशपरंपरा विश्वस्त रघुवीर द्रविड, विश्वस्त मधुकर म्हस्के, संजय सावंत, गौतम हंबर्डे,नागेश वाघ अजिनाथ म्हस्के, माजी सरपंच जयवंत शिंदे, अँड पोपट म्हस्के, राजेंद्र हंबर्डे,भोर दाजी , कृष्णा म्हस्के, राहुरल पोटरे, बाळासाहेब काळभोर,सतिष म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, युवराज म्हस्के, महेश म्हस्के, बाळासाहेब हंबर्डे, संभाजी म्हस्के,सुधीर म्हस्के, दत्तात्रय बनकर, सुनील म्हस्के, दत्तात्रय म्हस्के, रवीराज पोटरे, निलेश पोटरे,
ह.भ.प भाऊसाहेब आन्हाड महाराज, पुजा अर्चा देवा उमाकांत जावळे, डॉ राजेंद्र म्हस्के,सेवा सोयटी, ग्रामपंचायत पदाधिकारी, आदी या ठिकाणी श्रमदान सेवा बजावत असल्याने सर्वांच्या सहकार्याने ४३ वर्ष सप्ताहाचे पुर्ण झाले आहे.



