अहिल्यानगरच्या मुकुंदनगर उपनगरातील खेळाडूंचे ऑल इंडिया कराटे स्पर्धेत मोठे यश संपादन !*
अहिल्यानगरच्या मुकुंदनगर उपनगरातील खेळाडूंचे ऑल इंडिया कराटे स्पर्धेत मोठे यश संपादन !
प्रतिनिधी : संवेद वायकर
बारामती – बारामती येथे झालेल्या ऑल इंडिया कराटे स्पर्धेत नगर शहरातील मुकुंदनगर भागातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी पदके पटकावली. या स्पर्धेत इब्राहीम शेख, हंझाला शेख, अली शेख आणि हुसेन शेख यांनी उत्कृष्ट खेळ करून सुवर्णपदक पटकावले. तर अरसलान सय्यद, सफुरा शेख, महेक पठाण आणि आरिझ शेख यांनी प्रभावी लढत देत रौप्य पदक मिळवले.
नगरच्या इतर खेळाडूंनी कांस्य पदक जिंकत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. कांस्य विजेत्यांमध्ये झारा आंबेकर, दुआ शेख, हुसेन चौधरी, अर्शिया पठाण, अहमद शेख, अरीबा शेख, हफसा शेख, नश्रा इनामदार, राजिक शेख, सौद शेख, इरम खान, मुस्तफा शेख, युसुफ सय्यद, उमर शेख, हुजेर शेख, अब्दुल्ला सय्यद, अब्दुलरहमान सय्यद, झैद शेख, तमीम सय्यद, ऐमन शेख, अरकम सय्यद, तुबा पठाण, झारा शेख, इब्राहीम जावेद शेख, इंशा सय्यद, आरिझ सय्यद, मुशफिरा शेख, मुफिझ शेख, क्रिस्टीना सालवे, मोआझ शेख, युसरा सय्यद, ओम वाघ आणि नुरैन शेख यांचा समावेश आहे.
या घवघवीत यशामागे युथ कराटे फेडरेशनचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सबिल सर आणि साहिल सर यांनी कोच म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, तर प्रशिक्षक सुजित हजारे, अजीम सय्यद आणि ओम वाघ यांनीही खेळाडूंना आवश्यक मार्गदर्शन केले.
सदर स्पर्धेला शिहान मिनानाथ भोकरे आणि आंतरराष्ट्रीय कराटेपटू प्रणय शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत शर्मा यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे युवा खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा दिली.
नगर शहरातील मुकुंदनगर भागातील खेळाडूंच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण पसरले असून सर्व विजेत्यांचे अभिनंदन होत आहे.


