Breaking
ब्रेकिंग

5 नोव्हेंबरला विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे वेधणार लक्ष; संघटनाचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

0 8 9 6 7 5

5 नोव्हेंबरला विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे वेधणार लक्ष; संघटनाचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

अहिल्यानगर /  प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त कृती समितीतर्फे 5 नोव्हेंबर 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते उच्च शिक्षण संचालक कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना त्वरित न्याय मिळावा यासाठी राज्यातील सर्व विध्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संयुक्त कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी महासंघ वतीने आंदोलन पुकारण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष वैभव रोडी, उपाध्यक्ष बाळासाहेब इघे व सचिव संतोष कानडे यांनी दिली.
या मोर्चात जिल्हातील सर्व संघटनाचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश म्हसे, महासचिव रावसाहेब त्रिभुवन तसेच संयुक्त कृती समितीचे प्रमुख अजय देशमुख यांनी केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत आश्वासित योजनेचे 10,20 आणि 30 वर्षाचे तीन लाभ तात्काळ लागू करणे, विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवसांचे काम लागू करणे, प्रयोगशाळा व ग्रंथालय परिचरांना सुधारीत ग्रेड पे वेतन लागू करणे, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरणे आणि कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे