Breaking
ब्रेकिंग

हिंगणगाव केंद्रात हर्षाली चेडे प्रथम

0 7 9 8 0 4

हिंगणगाव केंद्रात हर्षाली चेडे प्रथम

 

नगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ग्रामविकास विद्याप्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय इसळक निंबळक येथील विद्यार्थिनी हर्षाली प्रदीप चेडे हिने ९४ टक्के गुण मिळवून हिंगणगाव केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला असून विद्यालयाचा आतापर्यंतचा विक्रम मोडला आहे.

हर्षाली ही वाहन चालक म्हणून कार्यरत असलेल्या प्रदीप कृष्णा चेडे व कोमल चेडे यांची कन्या असून कृष्णा रामभाऊ चेडे यांची नात आहे. यशाच्या आड कोणतीही परिस्थिती येत नाही हे तिने दाखवून दिले आहे. तिच्या या यशामुळे शाळा व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निकालाच्या दिवशी विद्यालयाचे सहसचिव अविनाश कोतकर, रावसाहेब म्हस्के सर व शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जाजगे मॅडम यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

या यशाबद्दल वर्गशिक्षिका कोतकर शांता मॅडम यांच्यासह कोतकर मारुती सर, कोतकर विलास सर, चौधरी मॅडम, डोळस सर, गायकवाड सर, बाळासाहेब कोतकर सर, बांडे सर, होळकर सर, गीता डहाळे मॅडम या सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केल्यामुळे हे यश मिळाल्याचे हर्षालीने सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे