Breaking
ब्रेकिंग

चालकास धारदार शस्त्राने मारून ट्रक लुटण्याचा प्रयत्न

पाठलाग करत नगर तालुका पोलिसांनी आरोपींना केली अटक

0 7 6 9 4 3

चालकास धारदार शस्त्राने मारून ट्रक लुटण्याचा प्रयत्न

पाठलाग करत नगर तालुका पोलिसांनी आरोपींना केली अटक

एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क

नारायणडोह शिवारामधे चोरी करण्याच्या उद्देशाने ट्रक चालकास धारदार शस्त्राने जिवे ठार मारणाऱ्या आरोपींचा अर्धा तास पाठलाग करुन अटक करण्याची कामगिरी नगर तालुका पोलिस ठाणे यांनी केली आहे .

घटनेची माहिती अशी की, दि.११/०२/२०२५ रोजी सकाळी ११/०५ वा. माहिती मिळाली की, ओसवाल इंपिरीअल चव्हाण व साहेबा आनंदा गायकवाड दोघे रा. वाळूज ता.जि.अहिल्यानगर यांनी एक वाळूज बायपास रोडवरुन कंटेनर घेवून कुरण वस्ती, नारायणडोह शिवार याठिकाणी लाईटचे केबल पोल व इलेक्ट्रीक पोलला धडक देवून नुकसान केले आहे.व एक अनोळखी व्यक्ती जखमी अवस्थेत रोडच्या बाजूला पडलेला आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही सपोनि गिते व पोलीस स्टाफ सह तात्काळ घटनास्थळी रवाना झालो. सदर ठिकाणी गेल्यानंतर नवनाथ मुरलीधर जायभाय यांच्याकडून समजले की, सकाळी १०/३० ते ११/३० वा.च्या दरम्यान ओसवाल इंपिरीअल चव्हाण व साहेबा आनंदा गायकवाड दोघे रा. वाळुंज ता.जि. अहिल्यानगर यांनी कंटेनरच्या चालकास चाकूने मारले असून ते त्यांनी कंटेनर इलेक्ट्रीक पोलला धडक देवून आम्ही त्यांचा पाठला करत असताना नारायणडोह रेल्वे ब्रीज खाली त्यांना अडवले असता त्यांनी सदरचा कंटेनर ब्रीज खाली सोडून देवून मला चाकूचा धाक दाखवून कुरण वस्तीकडे जाणाऱ्या रेल्वे पटरीने पळाले आहेत अशी माहिती दिली.

त्यानंतर आम्ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला सो, अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे सो अहिल्यानगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संपतराव भोसले, नग्रावि, मा. पोनि श्री. दिनेश आहिरे सो स्थागुशा यांना माहिती दिली व आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हे रेल्वे पटरीने पळत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही व पोलीस स्टाफ तात्काळ रेल्वे पटरीकडे जाऊन दोन ते अडीच किलोमीटर आरोपींचा पाठलाग करुन आरोपींना पकडले. त्यांच्या कपडयांवर रक्ताचे डाग दिसून आले. व कंटेनरची चावी खिशात मिळून आली. कंटेनर कोठे आहे असे विचारले असता त्यांनी कंटेनर हा ब्रीजच्या खाली उभा केला असल्याचे सांगितले व गुन्हा केल्याची कबूली दिली. व गेला माल २८,००,०००/- रुपये किंमतीचा हरभरा व ४०,००,००० /- रु. किं.चा कंटेनर हस्तगत करुन आरोपीविरुध्द भा.न्या. संहिता कलम १०३(१),३०९(६),१११,३२४(४) (५), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि प्रल्हाद गिते करत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो. व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे सो.मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संपतराव भोसले सो. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते नगर तालुका पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक पतंगे, सफौ/ रमेश गांगर्डे, पोहेकों/झावरे, पोकों/बांगर, पोकों/अन्सार शेख, पोकों/राजू खेडकर यांचे पथकाने केली आहे.

2/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे