Breaking
ब्रेकिंग

क्लासेस संघटना PTA च्या वृक्षारोपण उपक्रमातून पर्यावरणप्रेम व शिक्षक दिन साजरा*

0 7 6 9 4 1

*क्लासेस संघटना PTA च्या वृक्षारोपण उपक्रमातून पर्यावरणप्रेम व शिक्षक दिन साजरा*

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- अमळनेर, रविवार, 7 सप्टेंबर 2025 शिक्षक दिनाच्या पावन निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर ‘माझा क्लास, माझे झाड’ या प्रभावी संकल्पनेअंतर्गत पर्यावरणपूरक भव्य वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात राज्यभरातील विविध PTA क्लास संचालकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.
अमळनेरमध्येही या मोहिमेचा जोरदार प्रतिसाद उमटला. अमळनेर PTA क्लासेस संघटनेचे सक्रिय सहकार्य लाभून अंबरिष ऋषी टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून अमळनेर PTA क्लासेस संघटनेचे मान्यवर सदस्य उपस्थित होते.
यामध्ये प्रमुख उपस्थित व्यक्तींमध्ये भैय्यासाहेब मगर सर (अध्यक्ष), किरण माळी सर, ॲड.नागराज माळी सर, राकेश बडगुजर सर, सुरश्री वैद्य मॅडम, शेखर कुलकर्णी सर, ज्ञानेश्वर मराठे सर, सुधीर टाकणे सर, हर्षल बडगुजर सर, संदीप महाजन सर, राजपूत सर आणि अंबरिष ऋषी टेकडी ग्रुप उपाध्यक्ष श्री.नरेश
कांबळे, श्री.सूरज अभंगे यांचा समावेश होता.
तसेच सामाजिक वनीकरण विभाग अमळनेर वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती सुनिता धनगर
वनपाल श्रीमती वैशाली साळी वनरक्षक श्रीमती सिमा शिंदे वनरक्षक श्री दिनेश देवरे रोप वाटिका वनमजूर श्री दिनेश सैंदाणे सहकारी श्री प्रमोद पाटील सहकारी श्री भटू पाटील यांचे सहकार्य लाभले.
या भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पर्यावरण संवर्धनाची जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान सर्वांनी मिळून वृक्षारोपण केले व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे निर्धार व्यक्त केले.प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर सर यांनी
आपल्या मनोगतातून सांगितले –
“शिक्षक दिन हा केवळ शिक्षकांचे सन्मान करण्याचा दिवस नसून, समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण व पर्यावरण संवर्धन दोन्हीची जबाबदारी आपल्याला पेलणे आवश्यक आहे.”या उपक्रमामुळे विद्यार्थी, शिक्षक व समाजातील नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची सखोल जाणीव निर्माण होण्यास मदत होणार आहे. आगामी काळातही अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन सुरू ठेवण्याचे वचन PTA संघटनेने दिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे