Breaking
ब्रेकिंग

सिद्ध गोरक्षनाथ मंदिर पायी दिंडीचे २२ फेबु ला प्रस्थान

0 3 9 0 7 2

सिद्ध गोरक्षनाथ मंदिर पायी दिंडीचे २२ फेबु ला प्रस्थान

एस डब्ल्यू न्यूज / वृत्तसेवा

नगर-     ॐ शिव सिध्द चैतन्य श्री गोरक्षनाथाच्या आशीर्वादाने सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुवर्य बबन(तात्या) काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्री निम्मित सिध्द गोरक्षनाथ मंदिर,देऊळगाव गलांडे,ता श्रीगोंदा ते श्री क्षेत्र गोरक्षनाथगड (मांजरसुंभा )डोंगरगण,तालुका नगर पायी दिंडी सोहळा जाणार आहे
दिनांक २२ फेबुवारीला गोरक्षनाथ मंदिर, देऊळगाव गलांडे येथून दिंडी निघणारा आहे,दिंडीत गुरुवर्य बबन(तात्या)काटकर यांच्यासह सुमारे ३०० च्यावर नाथभक्त सहभागी होणार असून यामध्ये किर्तनकार दत्तात्रय महाराज ढोरजकर,केशव महाराज वाबर व अश्विनीताई महाराज रणसिंग,पखवाज वादक माऊली महाराज सौताडे व श्रीनिवास महाराज राजगुरु तर देऊळगाव गलांडे, लाडगाव,भानगाव, वडगाव,चिंचोली गुरव,मांडवगण फराटा,नागरगाव भजनी मंडळ हे भजनी मंडळ सहभागी होणार आहेत
दिंडी निघाल्यावर गोरक्षनाथ मंदिर,खांडगाव, गोसावीवाडी ला मुक्काम करण्यात येणार असून  दुसऱ्या दिवशी सिद्धेश्वरमंदिर मांडवगण, अंबिलवाडी,वाटेफळ येथे मुक्काम तर तिसऱ्या दिवशी वाकोडी फाटा,दरेवाडी हुन दिंडी नगरला येणार असून ,वसंत टेकडी, नगर येथे थांबणार आहे,यावेळी नगर शहरातील भाविक मोठ्या संख्नेने उपस्थित राहतात,तर मुक्काम शेंडी येथील दत्त मंदिरात होणार आहे ,दिंडीत भाविक गोरक्षनाथांचा जयघोष करत नाथांची गाणे म्हणतात .
महाशिवरात्रीला दि .२६ फेबुवारीला पिंपळगाव माळवी मार्गे पायी दिंडी गोरक्षनाथ गडावर जाणार आहे,महाशिवरात्रीला पूजा अभिषेक गडावर गुरुवर्य बबन(तात्या) काटकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.दिंडीचे नियोजन सर्व सिद्ध गोरक्षनाथ सेवक व भक्त परिवार यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क विकास काटकर मो.7350195858 यांच्याशी करावा व सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे