साईनाथ विद्यालयात साय: क्रीडा मंडळाचे उद्घाटन उत्साहात
साईनाथ विद्यालयात साय: क्रीडा मंडळाचे उद्घाटन उत्साहात
राहुरी तालुका जावेद शेख
शिर्डी येथील साईनाथ विद्यालयात सायन क्रीडा मंडळाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य श्रीयुत वारुळे सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता दहावी अ व इयत्ता दहावी ब या दोन संघांदरम्यान कबड्डीचा सामना खेळवण्यात आला.यात इयत्ता दहावी अ चा संग विजय ठरला.तसेच शिक्षकांसाठी हॉलीबॉलचा सामना खेळवण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री हंगेकर सर यांनी केले.मनोगतात विद्यालयाचे प्राचार्य श्री वारुळे सर यांनी विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे तसेच शारीरिक तंदुरुस्ती व आरोग्य खेळामुळे सुधारते यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या मंडळात सहभागी व्हावे असे प्रतिपादन केले. मनोगतात विद्यालयाचे पर्यवेक्षक श्रीयुत जाधव सर यांनी खेळातून संघभावना,शिस्त आणि नेतृत्व गुण विकसित होतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो व आत्मविश्वास वाढतो अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार सौ आघाव यांनी मांडले. सूत्रसंचालन श्री ढाकणे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व अध्यापक सेवक यांनी सहकार्य केले. तर सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात शिस्त ठेवून आनंद लुटला. शाळा समितीचे को- चेअरमन मनोज भाऊ लोढा व सदस्यांनी मार्गदर्शन केले.संस्थेच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया यांनी शुभेच्छा दिल्या.


