छावा ट्रेकींग ग्रुपने केला अवयव दानाचा संकल्प
छावा ट्रेकींग ग्रुपने केला अवयव दानाचा संकल्प
श्रीगोंदा / प्रतिनिधी – आदेश उबाळे
श्रीगोंदा येथील छावा ट्रेकींग ग्रुपने हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर गडावर शिवजयंती उत्सव साजरा केला यावेळी छावा गुरुपच्या ६५ मावळ्यांनी अवयवदान करुन जीवनदान देण्याचा अनोखा संकल्प केला या मोहीमेस प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांचे वडील मधुकरराव रहाणे उपस्थित होते.
सुरुवातीला मधुकर रहाणे यांचे हस्ते गडपुजन करण्यात आले अग्नीपंख फौंडेशनने बांधलेल्या शाळेस भेट दिली सात रंगाची माती रायरेश्वर महाराजांचे दर्शन घेतले.
नवनाथ खामकर यांचे नेतृत्वाखाली छावा ट्रेकींग ग्रुपने पहिलीच मोहीम काढली होती यामध्ये शाळेतील मुल महीला व पुरुष उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. राजकुमार इथापे यांनी भोजन व शरद मचाले यांनी चहापाण्याची व्यवस्था केली होती मधुकर रहाणे म्हणाले कि, छावा ट्रेकींग ग्रुपने अवयव दानाचा संकल्प करुन शिवजयंती साजरी केली या प्रेरणादायी उपक्रम आहे. शिवरायांनी उभे केलेले हिंदवी स्वराज्य आणि गडकिल्ले ही महाराष्ट्राची शान आहे. त्यांचे जतन संवर्धन करणे काळाची गरज आहे. अग्नीपंख फौंडेशनने रायरेश्वर गडावर उत्कृष्ट दर्जाची शाळा इमारत बांधली आहे.
छावा ट्रेकींग ग्रुपचे अध्यक्ष नवनाथ खामकर म्हणाले कि छावा ट्रेकींग ग्रुप हा ना नफा ना तोटा तत्त्वावर गडकिल्ले दाखविणे शिवरायांच्या कार्याचा प्रसार करण्याचे काम करणार आहे.
यावेळी शहाजी खेतमाळीस, प्रा शंकर गवते, संतोष सांगळे, नवनाथ दरेकर,रेश्मा डांगे, प्रकाश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दत्ताजी जगताप यांनी केले.