पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन वसंतोत्सव उत्साहात संपन्न
पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन वसंतोत्सव उत्साहात संपन्न
प्रतिनिधी :- पंकज पाटील
पारोळा :- पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे एकदिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन वसंतोत्सव २०२५ पुरस्कार व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाले. संस्थेचे अध्यक्ष अॅड. वसंतराव मोरे, सचिव पराग मोरे, संचालक ॲड. रोहन मोरे यांनी स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संचालक भानुदास मोरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक सुनील पवार होते. पोलिस निरीक्षक सुनिल पवार त्यांच्याहस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात वादळाने कोसळलेल्या दिडशे वर्षांपूर्वीचा वृक्ष त्या अनाम वृक्ष व अनाम मुक कळ्यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मरणशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यांनी सदर पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांनी जीवनात मेहनतीने, अभ्यास करून यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रा.डॉ.संजय भोळे यांच्याहस्ते करण्यात आले. पारितोषिक वितरणासाठी प्रमुख अतिथी प्रा.डॉ. योगिता चौधरी होत्या. कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून व रोपाचे जलपूजन करून करण्यात आले. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.एस.बी. भावसार, डॉ.जी.पी. बोरसे, डॉ. अजय पाटील, डॉ. वंदना पाटील, प्रा.पी.पी. पाटील, डॉ. एम. आर. करंजे, डॉ. एस. व्हि. चव्हाण, प्रा.आर.बी.पाटील, प्रा.ए.ए. मोरे, प्रा. निलाक्षी पाटील, के. वाय. पाटील, चंद्रकांत निकम उपस्थित होते. प्रास्ताविकात स्नेहसंमेलनाध्यक्ष डॉ. एस.बी. सावंत यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडला. तसेच प्राचार्य डॉ. व्हि. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून सहजीवन व्याख्यानमालेचे उद्घाटन देखील झाले. प्रथम पुष्प प्रा.डॉ. संजय भोळे यांनी
माय व बाप याविषयावर गुंफले त्यांनी माय हि मॅनेजमेंट सांभाळते तसेच ती जन्मदात्री आहे, माती जगायला अन्न देते तर मातृभूमी स्वाभिमान शिकवते यांना कधीच विसरू नये. बाप हा सतत कष्ट करून मुला मुलींचे स्वप्न साकार करण्यासाठी कष्ट करतो हे विविध कवितांद्वारे पटवून दिले. द्वितीय पुष्प प्रा. डॉ. योगिता चौधरी यांनी विद्यार्थी व मोबाईल या ज्वलंत विषयावर अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. व्हि.आर. पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे तसेच भविष्यात विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम राबविण्यात येतील असे सांगून स्नेहसंमेलनाचा आनंद घेण्याचे आवाहन केले. विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांचा आवडीचा विविध गुण दर्शनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात शिवजन्मोत्सव पाळणा, देशभक्तीपर गीते, चित्रपटातील गीते, एकल नृत्य, लावणी, रिमिक्स गीते यामुळे कार्यक्रमात रंगत आली प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली तसेच शेला पागोटे वाचनाने कार्यक्रमात रंगत आली. प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी व कर्मचारी वृंद यांच्या यशाचा कार्य गौरव पुरस्कार पारितोषिक, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्य गौरव सोहळा प्रमुख अतिथींच्या हस्ते संपन्न झाला. सूत्रसंचालन डॉ. आर. बी. नेरकर, डॉ. एस. व्हि. चव्हाण, डॉ. अजय पाटील, प्रा.एम. आर. नेरकर यांनी केले तर आभार प्रा.पी.एस. कोळी यांनी मानले. बक्षिस वितरण यशस्वीतेसाठी प्रा.जे.बी. पाटील, प्रा.एन.व्हि. पाटील, प्रा. सीमा साळुंखे, प्रा.योगिता पाटील, पी.एस. पाटील, किरण पाटील, शिवाजी पाटील यांनी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.