Breaking
ब्रेकिंग

शिक्षक भारतीच्या जिल्हा संघटकपदी प्रा. प्रविण काळे, तर महिला सचिवपदी प्रा. वंदना जाधव यांची नियुक्ती

0 8 6 5 0 8

शिक्षक भारतीच्या जिल्हा संघटकपदी प्रा. प्रविण काळे, तर महिला सचिवपदी प्रा. वंदना जाधव यांची नियुक्ती 

राहुरी तालुका जावेद शेख

शिक्षक भारती संघटनेच्या वतीने सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये अहिल्यानगर जिल्हा संघटक म्हणून प्रा. प्रविण विठ्ठल काळे आणि जिल्हा महिला सचिव म्हणून प्रा. श्रीमती वंदना अरुण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभाग कार्याध्यक्ष प्रा. महेश पाडेकर यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत. प्रा. प्रविण काळे हे श्री मुलाकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, निघोज (ता. पारनेर) येथे कार्यरत असून त्यांची निवड जिल्हा संघटक (उच्च माध्यमिक विभाग) म्हणून करण्यात आली आहे. तर, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथील प्रा. वंदना जाधव यांची जिल्हा महिला सचिव (उच्च माध्यमिक विभाग) पदी वर्णी लागली आहे.
जिल्हास्तरावर शिक्षक भारतीची संघटन बांधणी करणे, प्रसार व प्रचार करणे तसेच शिक्षण, समता, प्रतिष्ठा आणि संधी प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकशाही व विज्ञानभिमुख समाजरचनेसाठी कार्य करण्याचे आवाहन या नियुक्ती पत्राद्वारे करण्यात आले आहे. ​या निवडीबद्दल शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे,विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, महिला जिल्हाध्यक्षा रूपाली कुरुमकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय तमनर, सचिन जासूद,दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, संघटक चंद्रशेखर हासे,सहसचिव राहुल कानवडे ,तालुका अध्यक्ष सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, साई थोरात,संपत वाळके,दिगंबर देसाई,रूपालीताई बोरुडे,कल्पना चौधरी, मफीज इनामदार,दीपक फापाळे,गणपत धुमाळ,विजय पांडे, अमोल तळेकर,संतोष नवले,बाबासाहेब तांबे,अकील फकीर,बाबाजी लाळगे,वैभव चोथे,प्रवीण मालुंजकर,श्याम जगताप आदींनी अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे