मा . आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन
तातडीने उपकेंद्र कार्यान्वित करा

मा . आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन
तातडीने उपकेंद्र कार्यान्वित करा
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
पारोळा :- शेळावे ता. पारोळा, जि. जळगाव येथे सुरू असलेले ३३/११ KV उपकेंद्राचे काम मुदत संपूनही अद्याप कार्यान्वित झालेले नाही. यामुळे परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर कृषिभूषण साहेबराव पाटील (माजी आमदार, अमळनेर) यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन पाठवून तातडीने उपकेंद्र कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.साहेबराव पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महावितरणच्या पाचोरा विभागाअंतर्गत रुद्रा इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनीअरींग वर्क्स, शहादा या ठेकेदाराला जास्त दराने निविदा मंजूर करण्यात आली होती. २७ जून २०२३ रोजी ९ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र ३१ मार्च २०२४ ही अंतिम मुदत संपूनही काम पूर्ण झालेले नाही.राज्यातील १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत अशा प्रलंबित कामांची तातडीने पूर्तता होण्याची अपेक्षा असताना, या उपकेंद्राचे काम रखडल्याने विकासकामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे राजवड आदर्श गावासह परिसरातील इतर गावांचा गावठाण फिडरमध्ये समावेश करण्याच्या दृष्टीने हे उपकेंद्र त्वरित सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.