गुंडेगाव येथे विजयादशमी उत्सव भक्ती भावात साजरा…
भव्य दिव्य मंदिर शिखर व आकर्षक शिल्पांकनाने नागरिकांमध्ये आनंद व समाधान.

गुंडेगाव येथे विजयादशमी उत्सव भक्ती भावात साजरा…
भव्य दिव्य मंदिर शिखर व आकर्षक शिल्पांकनाने नागरिकांमध्ये आनंद व समाधान.

वाळकी / प्रतिनिधी : दादा आगळे
गुंडेगाव येथील ग्रामदैवत श्री तुकाई देवीचे पुरातन मंदिर असून नवसाला पावणारी ग्रामदेवता अशी या तुकाई देवीची ख्याती आहे.श्री तुकाई देवीची मंदिर पुरातन असून नवरात्र मध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक महीला भक्त येत असतात,या मंदिराभोवती शेतीशिवार असल्याने परीसरात हिरवाई बहरली आहे,तसेच देवीचा शेंदूरचर्चित आकर्षक तांदळा मुर्ती असुन तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे हे ठाणे असून शेकडो वर्षापूर्वीचा या मंदिराला इतिहास आहे, सध्या लोकसहभागातून भव्य मंदिराचे आकर्षक असे बांधकाम करण्यात आले असून यामुळे मंदिराची व परिसराची शोभा वाढली आहे.तसेच भविष्यात लोकवर्गणीतून भव्य सभामंडप, पुजारी निवासस्थान बांधण्यासाठी लोकांनी मंदिर समितीला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
या ठिकाणच्या परिसराला पुरातन ऐतिहासिक महत्त्व असून ऋषीमुनींच्या तपस्येने हे स्थान व परिसर पावन झालेला आहे, गुंडेगावची रंगनाथ शिंपी बाबा यांनी या देवीची आराधना करून देवीला प्रसन्न करून स्थापना केली आहे असे जुने जाणकार सांगतात.श्री तुकाई देवीची पूजापाठ त्यांचे वंशज सध्याची चुंबळकर कुटुंब करत आहे, गावात देवीवर श्रद्धा असणारा मोठा भक्त गोतावळा असून मंदिरामध्ये दररोज आरती मोठ्या मनोभावाने भक्त करत असतात तसेच होमहवन केले जाते.दसऱ्याच्या सीमा उल्लंघनाने नवरात्र उत्सवाची सांगता होत असताना परिसरातील महिलांनी झांज पथक सादर करून आपल्या अद्भुत तालबद्ध सादरीकरणातून उपस्थितांचे मने जिंकली यावेळी मध्ये भक्ती,शक्ती आणि नारीशक्तीचा संगम पहावयास मिळाला.
तुकाई माता मंदिराचे पुजेचा मान चुंबळकर परिवाराकडे असून शिंपी बाबाचे वंशज चुंबळकर परिवारातील पुजारी म्हणून शिवाजी चुंबळकर,भवानीप्रसाद चुंबळकर,महेश चुंबळकर, संजय चुंबळकर, संदिप चुबळकर,राजू चुंबळकर हे पाहत आहेत.होमाचा मान ही त्यांना असून नवरात्र उत्सव मध्ये मंदिरामध्ये लाईटची आकर्षण व्यवस्था मंदिर कमिटीने केली होती.यावेळी गावातील भाविकांची मंदिर बांधकामासाठी आर्थिक सहयोग देऊन सढळ हाताने वर्गणी दिली असुन आजपर्यंत मंदिर शिखर बांधकामासाठी ३० ते ३१ लाख रुपये खर्च झाला आहे तसेच भविष्यात सभामंडप पुजारी निवासस्थान बांधकामासाठी २० ते २५ लाख खर्च अपेक्षित आहे असे मंदिर समितीने सांगितले.यावेळी गुंडेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गुंडेगावचे चेअरमन छबुराव हराळ यांनी ५१ हजार रुपये देणगी दिली आहे.
उत्सवासाठी मा.जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, ग्रामपंचायत उपसरपंच नानासाहेब हराळ, ग्रामपंचायत सदस्य संजय कोतकर, सुनिल भापकर, शिवनाथ कोतकर, संजय भापकर सर, नंदकुमार माने,भवानी प्रसाद चुबंळकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंदिर समितीचे यशवंत भापकर, ह.भ.प.अशोक महाराज पिंपरकर,धन्यकुमार हराळ, जयसिंग जाधव,भाऊसाहेब भापकर,अंबादास हराळ, बाळासाहेब चौधरी,एकनाथ कासार,सुनील भापकर, प्रशांत जाधव, मयुर जाधव,योगेश जवक,संदीप जाधव,संपत चौधरी,अशोक नाईक, झुंबर नाईक, रोहिदास नाईक, संपत चौधरी, सुभाष नाईक संजय नाईक, प्रकाश नाईक, शिवाजी नाईक, बाळासाहेब नाईक, महादेव चौधरी,विक्रम भापकर,योगेश जवळ,दादा जवक,सतीश जवक, शिवाजी जवळ, संदीप नाईक रावसाहेब कोतकर, बाळासाहेब नाईक, जयसिंग कोतकर, लालू कोतकर, मिलिंद हराळ, बाळासाहेब भापकर, अनिल भापकर, विकास शिर्के,विठ्ठल भापकर,भरत हराळ, रामदास हराळ, देविदास रणदिवे, नवनाथ हराळ, कांतीलाल भापकर, मोहन भापकर, वसंत भापकर, शहाजी भापकर, उत्तम भापकर, सुरेश भापकर,अमोल हराळ इ परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेत आहेत.



