सन १९९४/९५ च्या विद्यार्थ्यांकडून त्यांचा वर्गमित्र कै. दादासाहेब मोरे यांच्या स्मरणार्थ इ. १० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

सन १९९४/९५ च्या विद्यार्थ्यांकडून त्यांचा वर्गमित्र कै. दादासाहेब मोरे यांच्या स्मरणार्थ इ. १० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २१/ करमाळा येथील कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयातील सन 1994/95 सालातील इ.10 वी (अ) मधील विद्यार्थी / विद्यार्थिनींनी त्यांचा वर्गमित्र कै. दादासाहेब मोरे याच्या स्मरणार्थ, सदर शाळेमध्ये यंदा इ.10 वी मध्ये गुणानुक्रमे 1 ते 3 आलेल्या गुणवंत विध्यार्थ्यांचा सन्मान केला. सदर सन्मान सोहळा अण्णासाहेब जगताप महाविद्यालय येथे 21 जून रोजी पार पडला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. मुख्याध्यापक श्री सुनील जाधव सर, मा. उपमुख्याध्यापक श्री. भस्मे सर, मा. पर्यवेक्षक श्री अंकुशखाने सर, श्री. श्रीकांत मोरे सर हे उपस्थित होते.
तालुक्यात प्रथम क्रमांक आलेली कु. सई तनपुरे, द्वितीय क्रमांक आलेली कु. श्रुती चव्हाण आणि तृतीय क्रमांक असलेला चि. सक्षम वाघमारे या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांचे पालक व प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व मुलांचा सत्कार व सन्मान सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रुपेश पाटील सर यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. वैशाली कांबळे (जगताप) मॅडम यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी 94/95 बॅच चे सौ. सुषमा क्षीरसागर (काळे), सौ. वैशाली कांबळे (जगताप), श्री. सुधीर शहाणे, श्री. विजय राठोड, श्री. संदीप गांधी, श्री. विशाल पवार, श्री. अजय बागल, श्री. रुपेश पाटील, श्री. अमोल कोरे इं. उपस्थित होते.