१२ पैकी ११ जागांवर विजय मिळवून जय गजानन विकास पॅनलचा पराभव केला

१२ पैकी ११ जागांवर विजय मिळवून जय गजानन विकास पॅनलचा पराभव केला
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील विका सोसायटी निवडणुकीत विकास पॅनलने १२ पैकी ११ जागांवर विजय मिळवून जय गजानन विकास पॅनलचा पराभव केला आहे.
कावपिंप्री येथील दिनेश पाटील ,अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास पॅनलचे सर्वसाधारण मतदार संघात निंबा विठ्ठल पाटील , विनोद नीळकंठ पाटील ,अशोक सुकलाल पाटील , अंकुश गणपत पाटील ,कैलास भाऊराव पाटील , रमेश अर्जुन पाटील, सुरेश गोकुळ पाटील हे निवडून आले आहेत.
तर विरोधी पॅनलचे प्रल्हाद लटकन पाटील निवडून आले आहेत. महिला मतदार संघात विकास पॅनलच्या वैशाली किरण पाटील ,शोभाबाई श्रीराम पाटील, इतर मागासवर्गीय मतदार संघात छोटू बुधा पाटील , अनुसूचित जाती जमाती मतदार संघात राहुल साहेबराव सोनवणे निवडून आले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस पी महाजन यांनी काम पाहिले. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.