पोलीस बिनतारी सेवानिवृत्तांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…
राज्यभरातून आलेल्या अधिकारी व अंमलदारांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान
पोलीस बिनतारी सेवानिवृत्तांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…
राज्यभरातून आलेल्या अधिकारी व अंमलदारांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान
एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र पोलीस दलाचा अविभाज्य घटक असलेल्या पोलीस बिनतारी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा स्नेहमेळावा दि. २५ / ०३ / २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. सेवानिवृत्त पोलीस उप अधिक्षक बि.सं. श्री. पी. बी. सारडीवाल यांच्या संकल्पना साकार करण्यास सेनि.पो.उप. अधिक्षक, सर्वश्री. संतोष जोशी, अशोक व्यापारी, व्ही.के पाटील,सेनि. पोलीस निरीक्षक सर्वश्री कृष्णा हिसवनकर, हनुमंत रोहीले, कृष्णा वानखेडे, शिरीष बेगडे, सेनि पो.उप निरीक्षक उदय कुलकर्णी व आयोजन समिती सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन केले.
स्नेहमेळाव्यास सेनि.पोलीस अधिक्षक सर्वश्री एकनाथ आगे, प्रकाश सोनवणे, महादेवन, देशपांडे, हेमलता जंबगी उपस्थित होते. सर्वप्रथम राष्ट्रपती पदक प्राप्त सेनि.अधिकारी सर्वश्री बी. के दुकळे, किशोर अत्रे, मिलिंद बुचके, संतोष जोशी, कृष्णा हिसवनकर, काथार आदि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राज्य भरातून आलेल्या सर्व सनि अधिकारी व अंमलदारांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. वर्तमानातील तंत्रज्ञान, मोबाईल, नेटच्या अतिरेकाने व्यक्ती व्यक्तींमध्ये दुरावा निर्माण होत असल्याने अशा स्नेहमिलनाची नितांत आवश्यकता असल्याचे मत प्रत्येक उपस्थिताने व्यक्त केले, व वारंवार आयोजन करण्याचा संकल्प करण्यात आला. शेवटी सर्वांचे समुहचित्र घेऊन राष्ट्रगीत गायनाने स्नेहमेळाव्याची सांगता करण्यात आली.



