Breaking
ब्रेकिंग

आढळा धरण आज भरले ; लाभक्षेत्रात आनंदा ला उधाण

0 7 6 9 4 3

आढळा धरण आज भरले ; लाभक्षेत्रात आनंदा ला उधाण,

राहुरी तालुका /  विशेष प्रतिनिधी : जावेद शेख

तालुक्यातील देवठाण येथील 1060 दशलक्ष घनफूट क्षमतेचे आढळा धरण आज दुपारी 12 वाजता पूर्ण क्षमतेने भरले असल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले आहे. यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. सध्या 60 क्यूसकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

आढळा धरण हे 1060 दलघफू क्षमता आहे. हे धरण चालू वर्षी जुलै च्या पहिल्या आठवड्यात भरत असल्याने शेतकरी बांधव प्रचंड खुश आहेत. रब्बी पिक व पिण्याचे पाण्याची व्यवस्था झाली आहे.
अकोले तालुक्यातील देवठाण वीरगाव, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, पिंपळगाव निपाणी व गणोरे तसेच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ, जवळेकडलग, पिंपळगाव कोंझिरा, वडगाव लांडगा, चिकणी, राजापूर, निमगाव भोजापूर व चिखली ही आठ गावे व सिन्नर तालुक्यातील चास, नळवाडी व कासारवाडी दोन गावे अशा या १६ गावांना शेतीसाठी याच आढळा धरणातून पाणी मिळते याशिवाय पाच गाव पाणीपुरवठा योजना असून या गावांना पिण्यासाठीही या धरणातून पाणी दिले जाते त्यामुळे आढळा धरण भरणे परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे आहे. लाटांनी सांडव्याच्या बाहेर पाणी पडत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. लवकरच शासकीय जलपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती अकोले उपविभागीय जल अभियंता योगेश जोर्वेकर यांनी दिली

दरवर्षी भंडारदरा व निळवंडे धरण भरल्यानंतर आढळा धरण भरण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असे. परंतु यावर्षी आढळा धरण अगोदर भरत असल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे