स्वर्गीय भूमिका काटे च्या स्मृतिदिनानिमित्त शिवशाही फाउंडेशन तर्फे स्मरण भेट
स्वर्गीय भूमिका काटे च्या स्मृतिदिनानिमित्त शिवशाही फाउंडेशन तर्फे स्मरण भेट
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर येथील स्वर्गीय भूमिका उमेश काटे या बालिकेच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त शिवशाही फाउंडेशन तर्फे येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल ला भिंतीवरचे मोठे घड्याळ तसेच प्रत्येक वर्गाला दिनदर्शिका स्मरण भेट स्वरूपात देण्यात आले.
माजी केंद्रीय मंत्री तथा राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील, ४९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफ़िसर कर्नल अमित रॉय, आर्मी स्कूलचे प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, शिवशाही फाउंडेशन चे सचिव उमेश काटे यांच्या उपस्थितीत आर्मी स्कूलचे प्राचार्य विजय बोरसे यांना ही स्मरण भेट देण्यात आली.
यावेळी सूबेदार धर्मेंदर सिंह, हवालदार विक्रम निकम, सुनील सोनार, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब सुभेदार भटू पाटील, ज्येष्ठ शिक्षक बी डी पाटील आदींसह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.