Breaking
ब्रेकिंग

करमाळा आगाराला मिळालेल्या नविन बसेस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशाने

राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांची सोशल मीडियातून तालुकावासीयांना माहिती

0 7 6 9 4 3

*करमाळा आगाराला मिळालेल्या नविन बसेस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशाने

*राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांची सोशल मीडियातून तालुकावासीयांना माहिती

करमाळा (विशेष प्रतिनिधी सचिन जव्हेरी)

करमाळा आगाराला गेल्या काही दिवसांपूर्वी नवीन बसेस महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आल्या, या सर्व नवीन बसेस करमाळा आगाराला देण्यात याव्यात यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिवहन महामंडळाचे मॅनेजिंग डिरेक्टर (एमडी) श्री कुसेकर यांना सूचना केल्या होत्या आणि त्या सूचनेप्रमाणे लागलीच करमाळा आगारात नवीन बसेस “लालपरी” दाखल झाल्या असे मत करमाळा शहराचे युवक नेते आणि सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे असलेले सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. करमाळा तालुक्याचे मा आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी 14 जानेवारी 2025 रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन करमाळा आगारात अनेक बसेस या नादुरुस्त असून वेळोवेळी या बसेस प्रवासाच्या फेऱ्या मारताना मधेच बंद पडत आहेत, अचानक इंजिनचा प्रॉब्लेम येतो तर जुन्या झालेल्या बसेसचे घेरच अडकून पडतात आणि यामुळे शाळेला,कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसहित शहरी भागात उद्योगव्यवसायास येणाऱ्या अनेक शेतकरी, छोटे मोठे उद्योजक यांचं अतोनात नुकसान होत असल्याचे जिल्हाध्यक्ष आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले,तसेच तालुक्यात वेगवेगळ्या गावांना बसेसच्या रोज 200 फेऱ्या सरासरी होत असून 100 ते 125 बसेसची खरी आवशक्यता असताना फक्त 65 च बसेस धावत आहेत, त्यातील अर्ध्या बसेस च्या खिडक्या, दार तुटलेली आहेत तर काही बसेसमध्ये बसायला सीटच नाहीत असे मत त्यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केलेल्या मागणीपात्रात उल्लेख करत प्रामुख्याने करमाळा आगारासाठी नवीन बसेसची मागणी केली होती, जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी नवीन बसेस मिळाव्यात याचे मागणी पत्र दिलेले पाहताच ताबडतोब उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन महामंडळाचे एमडी श्री कुसेकर यांना दूरध्वनीवरून संपर्क करत करमाळा आगारात नवीन बसेस लगेचच देऊन टाका असा आदेश दिला होता आणि जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी नवीन बसेसची मागणी केलेल्या पत्रावर एमडी श्री कुसेकर यांना शेरा मारून उपमुख्यमंत्री कार्यालयातून ते पत्र परिवहन महामंडळाच्या कार्यालयात पाठवून दिले होते, या सर्व बाबींची परिवहन खात्याने लगेच दखल घेतली व एमडी श्री कुसेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा आदेश पाळत करमाळा आगाराला ताबडतोब नवीन बसेस देऊ केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळा सारख्या ग्रामीण भागातील लोकांची अडचण लक्षात घेऊन त्यांच्या अडचणीत त्यांना साथ दिली व तालुक्याच्या विकासात नवीन बसेस देऊन हातभार लावला यामुळे अजित दादांचे करमाळा तालुक्यातील जनतेकडून कौतुकांचा वर्षाव झाला, त्यामुळे करमाळा आगाराला मिळालेल्या नविन बसेस ह्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशाने व सहकार्यानेच मिळाल्याचे स्पष्ट मत करमाळा शहराचे युवा नेते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून परिवहन खात्याच्या एमडींना शेरा मारून दिलेले पत्र व फोटोंचा पुरावा देत व्यक्त केले आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे