Breaking
ब्रेकिंग

भिंगार तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही साठी अनुदान दयावे

अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0 4 3 3 3 3

भिंगार तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही साठी अनुदान दयावे

अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नगर : ८ / भिंगार तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत या बाबत अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने दिं- १३-२-२५ रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब व तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले होते .परंतु अद्यापही भिंगार तलाठी कार्यालयांमध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे लावण्यात आले नाही.भिंगार तलाठी कार्यालयात दररोजच्या कामकाजावर कॅमेराची निगराणी असणे अत्यंत महत्वाचे आहे.सध्या या कार्यालयात उत्पन्न दाखला,जागेच्या नोंदी व इतर कागदपत्रासाठी नागरिकाकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले जात आहे.सी.सी.टीव्ही कॅमेरे नसल्यामुळे या कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे आणि नागरिकांची लूट होत आहे.तलाठी कार्यालयात बाहेरचे एजंट लोक कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामे करून घेत आहे,ज्यामुळे सामान्य जनतेची पिळवणूक केली जात आहे.तरी नागरिकांची लूट थांबण्यासाठी भिंगार तलाठी कार्यालयात तातडीने सदरची उपायोजना करण्यात यावी.व भिंगार तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविणे कामी लवकरात लवकर अनुदान मंजूर करण्यात यावा‌ असे निवेदन अहिल्या नगर जिल्ह्यातील प्र. उपजिल्हाधिकारी मा.श्री अरुण उंडे साहेब यांना देण्यात आले.या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,जिल्हा सचिव आकाश ठाकुर सामाजिक कार्यकर्ते विकास पंडित,गोविंद घोडके,दिलीप सुर्यवंशी,धिरज बैद,पवन सेवक व संघटनेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे