Breaking
ब्रेकिंग

शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब शिंदे पाटील समाजभुषण पुरस्काराने सन्मानित

0 8 9 9 7 4

शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब शिंदे पाटील समाजभुषण पुरस्काराने सन्मानित

राहुरी तालुका जावेद शेख

अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समिती व ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशन लघुउद्योग विकास संघटना पुरस्कार सोहळा 20 रोजी शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.प्रदीप पा. खंडापूरकर बाबा यांच्या उपस्थित पार पडला.
यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समिती वतीने सामाजिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र व शाल पुष्पगुच्छ देत सत्कार सन्मान करण्यात आला.

सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे, शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री नानासाहेब शिंदे पाटील यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२५-२६ देण्यात आला .त्यावेळी श्री.प्रदीप पा. खंडापूरकर बाबा, अँड.राणीताई स्वामी यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले .

या कार्यक्रमाचे आयोजन सौ.नयनाताई शिरसाठ, मनोज दुशिंग,रमेश साबळे, बाळासाहेब शिरसाठ, सायली बनसोडे, रुपाली मोलाचे, सुरेंद्र महाले, पंकज पाटील, बाबासाहेब पगारे, सौ.मायाताई आरणे कैलास शेजवळ यांनी केले होते.

नानासाहेब शिंदे पाटील यांना समाजभुषण  पुरस्कार मिळाल्याने राजकिय सामाजिक सर्व स्तरातून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे