Breaking
ब्रेकिंग

करमाळा येथील रावगाव जवळ एसटी पलटी होऊन अपघात

करमाळा आगारातील एसटी बसच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवरच

0 3 9 0 2 5

करमाळा येथील रावगाव जवळ एसटी पलटी होऊन अपघात

करमाळा आगारातील एसटी बसच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवरच

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ३१/ रावगावजवळ एसटी बस पलटी होऊन अपघात घडला आहे. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. जखमींना तातडीने करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. समजलेल्या माहितीनुसार, करमाळा आगाराची एसटी बस (क्रमांक MH13 CU 7883) कर्जतहुन करमाळाकडे येत असताना रावगाव जवळील बुधवंत वस्तीजवळ आल्यावर स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने चालकाला गाडी कंट्रोल करता आली नाही व एसटी पलटी होऊन हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी रायगाव येथील ग्रामस्थ वेळेत पोहोचले व त्या ठिकाणी एसटीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. तसेच वेळेत ॲम्बुलन्स बोलवून जखमींना करमाळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर एसटी बस मध्ये 30 ते 35 प्रवासी गाडीत असल्याची माहिती मिळाली असून त्यापैकी 23 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळी घटनास्थळी रायगाव व परिसरातील ग्रामस्थांनी वेळीच मदत केली. त्यांनी बसच्या समोरील काच फोडून आत प्रवेश केला व प्रवाशांना बाहेर काढले. करमाळा पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केलेला आहे.

एसटी बस प्रवासासाठी आगारातून बाहेर काढल्यापासूनच एसटीची स्टेअरिंग हलत असल्याचे ड्रायव्हर कडून सांगण्यात आले व अपघाता वेळी एसटीचा रॉड तुटल्यामुळे ड्रायव्हरला गाडी कंट्रोल करता आली नसल्याची माहिती समोर आली आहे. करमाळा एसटी आगारातील बसेस सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे विविध मार्गावर बंद पडत असून बस च्या प्रवासाचा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. विविध कारणांमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून एसटीने प्रवास करावा लागत आहे. करमाळा आगार कधी जागे होईल अशी आशा व मत प्रवासी व्यक्त करत आहेत .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे