ब्रेकिंग
“माझी शाळा सुरक्षित शाळा” सुरक्षित शाळा
0
3
9
0
7
1
“माझी शाळा सुरक्षित शाळा” सुरक्षित शाळा
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
रस्ता सुरक्षा सप्ताह २०२५ अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस यांच्या वतीने “माझी शाळा सुरक्षित शाळा” अंतर्गत सुरक्षित शाळा व “स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी” पारितोषिक वितरण समारंभ सोहळा २०२५ चे आयोजन बालगंधर्व रंगभवन, रिलायन्स टाऊनशिप, नागोठणे येथे करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सुरक्षा गुणांकन प्राप्त 28 शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
अलिबाग पोलीस स्टेशन अंतर्गत कुरूळ येथील
सु. ए. सो. माध्यमिक विद्यालयाला हा पुरस्कार प्राप्त झाला असून मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
0
3
9
0
7
1