Breaking
ब्रेकिंग

उपमुख्यमंत्री जळगावचा होणार ?

खान्देशला मिळणार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची संधी?

0 3 9 0 6 1

उपमुख्यमंत्री जळगावचा होणार ?

खान्देशला मिळणार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची संधी?

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांचे झळकले भावी उपमुख्यमंत्री
म्हणूनचे बॅनर

प्रतिनिधी :- पंकज पाटिल

जळगाव :- खान्देशचा आतापर्यंत कधीही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होऊ शकलेला नाहीये. जे जे या पदाच्या स्पर्धेत आले, ते सर्व राजकीय षडयंत्राचे बळी ठरले. माझ्या बाबतीतही भाजपमध्ये असेच घडले होते, अशी खंत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभा निवडणुकीतील एका प्रचार सभेत बोलून दाखवली होती. परंतु आता शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील यांना उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा सुरू झाल्याने खान्देशला आता तरी न्याय मिळेल का? याचीच उत्सुकता सर्वांना लागून आहे.

गुलाबराव पाटील यांचा भावी उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले बॅनर जळगाव ग्रामीण मतदार संघात झळकल्यामुळे याची चर्चा अधिकच तीव्र झाली आहे.

राज्याच्या राजकीय वर्तुळात जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या भागातील नेत्यांनी नेहमीच आपापल्या पदाचा व आपापल्या नावाचा दबदबा राज्याच्या राजकारणात निर्माण केलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रतिभाताई पाटील यांनी थेट राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली होती. परंतु राज्याच्या राजकारण्याच्या दृष्टीने विचार केला तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पद नेहमीच खान्देशला हुलकावणी देत राहिले आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे