Breaking
ब्रेकिंग

आमदार संजयमामा शिंदे यांनी पंचवार्षिक मध्ये केलेले काम उल्लेखनीय:- आ. बबनदादा शिंदे यांचे प्रतिपादन

0 3 9 0 5 1

 

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १०/ करमाळ्यात आमदार संजयमामा शिंदे यांनी ५ वर्षात अतिशय चांगले काम केले असून त्याचा बदल सध्या दिसतो आहे. येणाऱ्या काळात कोणाचे सरकार येईल हे माहित नाही पण जे सरकार येईल ते काटावर येईल असे चित्र आहे. त्यात अपक्षाला चांगली संधी असून संजयमामा यांना तुम्ही पुन्हा आमदार करा. नक्कीच यापेक्षा अधिक चांगले दिवस येतील, असा विश्वास आमदार बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केला. वांगी येथे अपक्ष उमेदवार आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभे प्रसंगी आ. बबनदादा शिंदे बोलत होते. आ. बबनदादा म्हणाले की, आ. संजयमामा शिंदे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असल्यापासून या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. सामान्य माणसाला त्यांनी कायम न्याय दिला आहे. करमाळा- टेंभुर्णी महामार्गाचे काम करण्यासाठी त्यांना कायम पाठपुरावा केला आहे. तेव्हा ते काम मार्गी लागलेले आहे. काही मंडळींनी यामध्ये जाणीवपूर्वक अडचणी आणल्या. परंतु त्या अडचणी वरती मात करून महाराष्ट्र शासनाचा ना हरकत दाखला त्यांनी मिळवून दिला. त्यामुळेच हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे वर्ग झाला. त्याच्या भूसंपादनाचे काम आता सुरू आहे. लवकरच प्रत्यक्ष कामकाजालाही सुरुवात होणार आहे असे ते यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना आ. बबनदादा म्हणाले, विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना झाला तेव्हापासून करमाळा आणि आमचे नाते निर्माण झाले आहे. अडचणीची परिस्थिती असतानाही हा कारखाना दरवर्षी तालुक्यातील ऊस गाळप करत आहे. याचे सर्व पैसे वेळेवर आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने सतत काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या तालुक्यात सध्या चार कारखाने आहेत. तेथे तुळशीच्या लग्नाला ऊसही मिळत नव्हता पण आता तेथील प्रगती झाली आहे. कोणत्याही बाबतीत आमच्याकडून अडवणूक होत नाही. करमाळ्यात केळी संशोधन केंद्र व्हावे म्हणून आ. संजयमामा यांनी पाठपुरावा केला आहे. याबाबत विधानसभेत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आरोग्य क्षेत्रातही त्यांचे चांगले काम आहे. उजनी पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करून त्याला निधी मिळवला आहे. उजनी धरणात मत्सबीज सोडण्यासाठीही त्यांनी निधी मिळवला आहे’ असे ते म्हणाले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे