Breaking
ब्रेकिंग

मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ मार्च रोजी जळगाव दौऱ्यावर येणार

जळगांव येथे मनसेचे जिल्हा बैठकीचे आयोजन

0 7 9 9 5 4

मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ मार्च रोजी जळगाव दौऱ्यावर येणार

जळगांव येथे मनसेचे जिल्हा बैठकीचे आयोजन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

जळगाव :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती झाल्यानंतर गजानन राणे हे दि. २८ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. संपर्क अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच अधिकृत दौरा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दौऱ्यानिमित्त सकाळी ११ वाजता नेहरू चौक जळगांव येथील पद्मालय विश्रामगृहात जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बैठकीत जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, गट अध्यक्ष, अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी सेना, नवनिर्वाचित सदस्य व महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकी दरम्यान तालुकानिहाय पक्षकार्याचा आढावा घेतला जाणार असून संघटन मजबुती, पक्षविस्तार आणि आगामी राजकीय रणनीती यावर सविस्तर चर्चा होणार आहे. गजानन राणे आपल्या आक्रमक आणि संघटनात्मक शैलीसाठी ओळखले जात असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मनसेची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या बैठकीस सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहून संघटन बळकटीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांनी केले आहे.
या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील मनसे संघटनेला नवी ऊर्जा मिळणार असून, कार्यकर्त्यांना दिशा देणारा हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 9 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे