महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्य शिक्षण मंडळ, राज्य मंडळ पुणेचे अध्यक्ष गोसावी व सचिव देवीदास कुलाळ यांचेबरोबर बैठक संपन्न

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्य शिक्षण मंडळ, राज्य मंडळ पुणेचे अध्यक्ष गोसावी व सचिव देवीदास कुलाळ यांचेबरोबर बैठक संपन्न
प्रतिनिधी :- पंकज पाटील
पूणे :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्य शिक्षण मंडळ, राज्य मंडळ पुणेचे अध्यक्ष मा.श्री.गोसावीसाहेब व सचिव मा.श्री. देवीदास कुलाळसाहेब यांचेबरोबर सुमारे दोन ते अडीचतास बैठक संपन्न झाली केंद्र अदलाबदलाबाबत वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून यावर नक्की तोडगा काढला जाईल असे त्यांनी आश्वासित केले . तसेच बोर्ड कायम मान्यता, सेमी वर्ग मान्यता, इ. विषयावर चर्चा झाली. तसेच एक्झामिनर, मॉडरेटर आणि चिप मॉडरेटर यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबतचा निर्णय झाला. यावेळी *पुणे विभाग शिक्षक आमदार मा श्री जयंत आसगावकर सर, महामंडळाचे अध्यक्ष मा श्री तानाजी माने सर, सचिव मा.श्री नंदकुमार सागर सर, उपाध्यक्ष मा श्री सुनील पंडित सर, सचिन नलवडे सर, महामंडळाचे प्रवक्ते मा श्री प्रसादजी गायकवाड सर, सदस्य श्री भरत मोजर सर, अहील्यानगरचे अध्यक्ष तुकाराम बेरड सर, सोलापूर मुख्याध्यापक संघाचे सचिव बापू निळ सर,कार्याध्यक्ष पी.जे.सावंतसर, सेकंडरीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे सर तसेच महामंडळाचे माजी प्रवक्ते मा श्री महेंद्र गणपुले सर देखील उपस्थित होते.