Breaking
ब्रेकिंग

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

0 8 9 6 7 3

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २७/ ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र निकत यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. बी द चेंज फाउंडेशन, कोपरगाव यांच्या वतीने रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी शिर्डी येथे आयोजित भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे, या उद्देशाने प्रा. डॉ. महेश निकत सातत्याने कार्यरत आहेत. ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी करमाळा व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

शिर्डी येथील साई पालखी निवारा, साईबाबा मंदिर परिसरात पार पडलेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. विशाल शेडे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, अहिल्यानगर उपस्थित होते.

यावेळी मा. श्री. अरुण भांडोरे (सेवानिवृत्त), कार्याध्यक्ष, त्रिदल सैनिक संघ, नाशिक व कार्याध्यक्ष, सैनिक फेडरेशन, नाशिक; मा. श्री. बाबासाहेब कापे, संचालक, विश्वरूप इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड; मा. श्री. निलेशजी घोडेचोर, मॅनेजर, पंजाब नॅशनल बँक; तसेच मा. निवेदिता पगार, अभिनेत्री, मॉडेल व उद्योजिका आणि मिसेस इंडिया २०२१ विजेत्या, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रा. डॉ. महेश निकत यांच्या कार्याचा हा सन्मान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या पुरस्कारामुळे ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, करमाळा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. प्रा. डॉ. महेश निकत यांच्यावर शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामीण शिक्षणाच्या उन्नतीसाठी समर्पित भावनेने केलेल्या कार्याला मिळालेला हा सन्मान भविष्यातील शैक्षणिक वाटचालीस नवी प्रेरणा देणारा ठरणार आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे