करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयचा विद्यार्थी चि. जयराज सचिन दळवे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत प्रथम; पुणे विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयचा विद्यार्थी चि. जयराज सचिन दळवे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत प्रथम; पुणे विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २०/ महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 /11 /2026 रोजी सोलापूर जिल्हा क्रीडा संकुल सोलापूर क्रीडांगण येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत खेळाडू कु. जयराज सचिन दळवे इयत्ता – 10 वी क याने या स्पर्धेत वयोगट 17 मध्ये प्रथम क्रमांक मिळवला व त्याची पुणे विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली याबद्दल त्याचे शाळेकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
या खेळाडूला श्री. सचिन बलभिम दळवे सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या वतीने संस्थेचे चेअरमन मा. आ. श्री जयवंतराव जगताप साहेब, मा. नगराध्यक्ष श्री. वैभवराजे जगताप, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री. शंभुराजे जगताप, संस्थेचे प्राचार्य श्री अनिस बागवान सर, पर्यवेक्षक श्री. महेश कांबळे सर, पर्यवेक्षीका सौ. नवले मॅडम, सायन्स विभाग प्रमुख श्री. विजयकुमार पवार सर संस्थेतील शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. तसेच पुढील पूूणे विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन श्री. मुलानी सर यांनी केले.



