वीजपुरवठा पूर्णपणे खंडित असल्याने नागरिकांना वीजेअभावी प्रचंड त्रास
*वीजपुरवठा पूर्णपणे खंडित असल्याने नागरिकांना वीजेअभावी प्रचंड त्रास

जळगाव / जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील
जळगाव :- आज 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:00 वाजल्यापासून आमच्या चंदू अण्णा नगर परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता आणि रात्री सुमारे 11:00 वाजता पुन्हा सुरू झाला. म्हणजेच जवळजवळ 6 तास नागरिकांना वीजेअभावी त्रास सहन करावा लागला.
या कालावधीत संबंधित दुरुस्ती कामासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नव्हते. तसेच ज्या खाजगी कंत्राटदारांकडे देखरेख व दुरुस्तीची जबाबदारी आहे, त्यांच्या एकाही कर्मचाऱ्याची उपस्थिती त्या ठिकाणी दिसून आली नाही. परिणामी, जे काम कमी वेळात पूर्ण होऊ शकले असते, त्यास अनावश्यक विलंब झाला.
या ठिकाणी सुमारे 100 च्या आसपास नागरिक उपस्थित होते, त्यापैकी 30-40 नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. या संपूर्ण प्रकारात पूर्णपणे व्यवस्थापन प्रणाली जबाबदार आहे.
या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी.
संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी.आपण या बाबीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी नागरिक मागणी करत आहेत .




