Breaking
ब्रेकिंग

मतदानाची वाढलेली टक्केवारी व आमचा पाठिंबा यामुळे तनपुरेंचा विजय निश्चित-सुरेशराव लांबे

0 3 9 0 3 2

मतदानाची वाढलेली टक्केवारी व आमचा पाठिंबा यामुळे तनपुरेंचा विजय निश्चित-सुरेशराव लांबे

जिल्हा प्रतिनिधी : जावेद शेख

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात सरासरी पेक्षा जास्त मतदान व आमच्या पाठिंब्याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांना होणार असल्याने तनपुरेंचा विजय निश्चित असल्याची माहिती तनपुरेंना पाठिंबा दिलेले बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी दिली.

पुढे लांबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि , गेली अनेक वर्षापासून शेतकरी वर्ग विविध संकटाचा सामना करत असताना गेल्यावर्षी महायुती सरकारने वाढवलेली कांदा निर्यात शुल्क.त्या पाठोपाठ 7 डिसेंबर रोजी केलेली कांदा निर्यात बंदीसह दुधाचे मोठ्या प्रमाणात पाडलेले भाव.डिझेल. पेट्रोल.रासायनिक खते पशुखाद्य.कृषी औषधे. घरगुती गॅस याच्या वाढलेल्या किंमती या कारणाने शेतकरी व सर्वसामान्य वर्गाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसल्याने महायुती सरकारने शेतकरी व सर्व सामान्य जनतेसाठी अनेक योजना व घोषणा केल्या व विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून दोन-तीन महिने आधी लाडकी बहीण लाडका भाऊ व इतर योजनेसह.शेतकऱ्यांना विज बिल माफी.शेती पंपाला मोफत वीज. कर्जमाफी.मोफत घरगुती तीन गॅस सिलेंडर व इतर घोषणा केल्या परंतु शेतकरी व सर्वसामान्य मतदारांचा या योजनेच्या फायद्यापेक्षा पूर्वीचे झालेले तोटे मोठे असल्याने या योजनेवर व या महायुती शासनावर शेतकरी मतदारांचा कुठल्याही प्रकारचा विश्वास नसल्याने पुन्हा एकदा शेतकरी व सर्व सामान्य मतदारांनी उस्फूर्तपणे मतदानात भाग घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात महायुती सरकारच्या उमेदवारांच्या विरोधात जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मतदान केले.त्यातच आम्ही दिलेल्या जाहीर पाठिंब्यामुळे राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरेंचा विजय निश्चित असल्याची माहिती बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी दिली.

5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे