सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
राहुरी तालुका जावेद शेख
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ४थी शिष्यवृत्ती परीक्षेत सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय ,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या शाळेतील ५ विद्यार्थ्यांनी अहिल्यानगर जिल्हा ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत स्थान पटकावले व शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.
१)कु. आरोही पंडीत पानसंबळ (जिल्ह्यात २ री)
२) चि. आर्य संतोष जाधव (जिल्ह्यात ५वा)
३) चि. सिद्धांतराजे जितेंद्र मेटकर (जिल्ह्यात ५४वा )
४) चि. समर संतोष पठाडे (जिल्ह्यात १८१ वा)
५) चि. अथर्व महेश घाडगे (जिल्ह्यात ३६३वा)
या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक श्री. विलास देशमुख, श्री. गोरक्ष उचाळे, श्रीम. तृप्ती हारदे,मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब खेत्री यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ.विलास खर्चे (कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी), सभापती मा. साताप्पा खरबडे,सचिव मा.डॉ. महानंद माने , सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री अरुण तुपविहिरे, प्रा. जितेंद्र मेटकर तसेच सर्व सन्मा.संचालक , सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी अभिनंदन केले.


